अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेत २३ सदस्य संख्या असून यापैकी ७ सदस्य राष्ट्रवादीकडे तर १६ सदस्य हे संजय खोडके यांच्या गटाशी जुळले आहेत. राष्ट्रवादीत एकमेकांच्या तंगड्या ओढण्याचे काम सुरु असल्याने मित्रपक्ष असलेला काँगेस पक्ष हे ‘ दोस्त दोस्त ना रहा’ या आनंदात आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत आघाडी धर्म पाळला जाणार नसल्याचे चित्र आहे. महापौर पदाची निवडणूक ही विधानसभा निवडणुकीच्या अगोदर असून यावेळी कोण कोणाशी? युती, मैत्री करतो, हे स्पष्ट होईल. राष्ट्रवादीत गटनेते पदाचा गुंता सुटण्याचे चिन्हे दिसून येत नाही. गटनेता अविनाश मार्डीकर की सुनील काळे? हा वाद उच्च न्यायालयात असल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश कोणी काढावा, यावरही ही निवडणूक अवलंबून आहे. आघाडीचा महापौर, उपमहापौर सहजतेने निवडून येईल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेत बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्यता नाही, असे प्रसार माध्यमांना जाहीरपणे सांगून वेगळा संदेश दिल्याचे दिसून येते. मात्र काहीही असो, महापौर पदाच्या निवडणुकीत आघाडीतच खडाजंगी होणार असल्याचे संकेत आहेत.
सप्टेंबरमध्ये निवडणूक, सर्वसाधारण प्रवर्गाला संधी
By admin | Updated: August 10, 2014 22:46 IST