शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

वृद्ध कोतवालांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:06 IST

वयाची साठीपर्यंत नोकरी करूनसुद्धा काहीच शिल्लक न राहिल्याने महसूल विभागातील म्हाताऱ्या कोतवालांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

मुलेही नाकारतात : शासनाने घ्यावी दखलअंजनगाव सुर्जी : वयाची साठीपर्यंत नोकरी करूनसुद्धा काहीच शिल्लक न राहिल्याने महसूल विभागातील म्हाताऱ्या कोतवालांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. चतुर्थ श्रेणीचा दर्जा नसलेल्या कोतवालास ५५ वर्षांपासून शासनाने वर्गीकृत न करता अवर्गीकृत ठेवले. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्ती वेतन, मोबदला किंवा एकरकमी रक्कम आदी काहीही मिळत नाही. जीव धोक्यात घालून सेवा करणारे कोतवाल आयुष्याच्या शेवटी निराधार होतात. प्रसंगी एखाद्या हॉटेलात कपबशा धुतात, कुणाच्या कारखान्यात अथवा शेतावर रखवाली करीत असल्याचे चित्र आहे. पूर्वी कोतवालांची संख्या शेकडोंच्या घरात होती. आता एका साझ्यास एक कोतवाल आहे. दर महिन्याला राज्यास ३५ जिल्ह्यांतून किमान शंभर कोतवाल रिकाम्या हाताने सेवामुक्त होतात. दुर्धर आजार, अपघात किंवा नक्षलग्रस्त भागात शासनाचे प्रतिनिधी म्हणून नक्षलवाद्यांच्या छळास बळी पडतात. त्यांच्या रिक्त जागेवर वारसांना कोणतीही संधी नाही. या धोरणामुळे शासन व समाज या दोन्ही स्तरावर कोतवाल कुटुंब दुर्लक्षित झाले आहे. देशातील गुजरात व त्रिपुरा राज्यात मात्र कोतवालांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता आहे. महाराष्ट्रात राज्य स्थापनेपासून त्यांना केवळ आश्वासन, वचन व शब्द देण्यातच सत्ताधाऱ्यांनी वेळ खर्च केला आहे. महागाईच्या काळात अल्प पगारामुळे कोतवाल कुटुंबाचे शिक्षण व पालनपोषण योग्य रितीने करू शकत नाही. इतर कर्मचाऱ्यांकरिता दर १० वर्षांनी वेतन आयोग येतो, कोतवालांना मात्र आश्वासन आयोग लागू असून महागाई निर्देशांक लक्षात घेऊनसुद्धा त्यांच्या वेतनात सुधारणा केली जात नाही. तलाठ्यास सर्व कामास मदत करणारा, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेवटच्या घटकाची माहिती शासनास देणारा, वसुलीत सहकार्य करणारा, शासकीय आदेशांना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचविणारा, २४ तास सेवेत राहणारा, कोतवाल ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत धावपळ करतो. पण त्याच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबत अजूनही कोणत्याच नेत्याने अथवा अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. (तालुका प्रतिनिधी)शासन कोतवालांप्रती गंभीर नाही५५ वर्षांत ७० हजार कोतवाल विनापेंशनचे व विनाश्रेणीचे घरी गेलेत. पण कोणत्याही पक्षाच्या शासनाने त्यांची दखल घेतली नाही. अधिवेशन काळात कोतवालांनी अनेक मंत्र्यांचे सत्कार केले. २००८ पासून कोतवालांना श्रेणी देण्याबाबत सहा वेळा प्रस्ताव तयार करण्यात आले पण कॅबीनेटमध्ये नामंजूर करण्यात आले. परिपत्रकानुसार सरसकट सोयी सवलती आवश्यक१९ जुलै २००१ च्या शासन परिपत्रकानुसार पाच वर्षे सेवा झालेल्या व ४५ वर्षांच्या आत असलेल्या कोतवालांना वर्ग चारमध्ये नियुक्ती देण्यात येऊन शासकीय सोयीसवलती देण्याची तरतूद आहे. परंतु सेवा ज्येष्ठ कोतवालांना मात्र यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. पूर्वी विशिष्ट समाजातील तरुण कोतवालाची नोकरी करीत असत मात्र आता कोतवालाची नोकरी करण्यासाठी सध्याच्या बेरोजगारीमुळे सर्व समाजातील तरुण अर्ज करतात. त्या दृष्टीने सोयी सवलती आवश्यक आहेत.