शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

उत्तरपत्रिकेवर विशिष्ट चिन्ह टाकण्याची सूचना

By admin | Updated: May 10, 2014 23:12 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावतीद्वारे घेण्यात आलेल्या मार्च २0१४ मधील वर्ग दहावीच्या शालान्त प्रमाणपत्र परीक्ष

मोताळा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावतीद्वारे घेण्यात आलेल्या मार्च २0१४ मधील वर्ग दहावीच्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उत्तर पत्रिकेवर विशिष्ट प्रकारच्या खुणा करण्याचे आदेश संबधीत शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना दिले असल्याची तक्रार धामणगाव बढे येथील डॉ.जाकीर हुसेन उर्दू हायस्कु लच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी अमरावती विभागीय सचिवाकडे केल्यामुळे या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की धामणगाव बढे येथील डॉ.जाकीर हुसेन उर्दू हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे मार्च २0१४ मध्ये पार पडलेल्या एस.एस.सी. बोर्डाच्या वर्ग दहावीच्या गणित-२(भूमीती)या विषयाच्या उत्तरपत्रिकांचे अवलोकन केले असता. अमरावती विभागाकडून व मुख्य समिक्षकांसह परीक्षकांच्या अहवालानुसार असे निदर्शनास आले होते की उत्तर पत्रिकेच्या मुखपृष्ठावर विशिष्ट प्रकारच्या चिन्हांकित खुणा करून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला गेला. याप्रकरणी अमरावती बोर्डाने गैरमार्गाचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत या गैरप्रकाराबाबत उर्दू शाळेतील ३१ विद्यार्थ्यांना चौकशीच्या नोटिसा पाठवून शुक्रवार ९ मे रोजी सकाळी ११ वाजता अमरावती बोर्डामध्ये मुख्याध्यापकांच्या ओळख पत्रासह लेखी उत्तर, स्पष्टिकरण, निवेदन किंवा समक्ष, चौकशीचे उत्तर देण्यासाठी स्वखर्चाने उपस्थित राहण्याची सुचना दिली केली होती. विद्यार्थ्यांनी चौकशीच्या कामी आवश्यक सहकार्य न केल्यास किंवा लांबविल्यास एकतर्फी कारवाई केल्या जाण्याची सूचना असल्यामुळे ९ मे रोजी धामणगाव बढे येथील चौकशीची नोटिस आलेल्या ३१ विद्यार्थ्यांंपैकी ९ विद्यार्थी व काही पालकवर्ग अमरावती बोर्डात गेले व त्यांनी चौकशी अधिकार्‍यांसमोर विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी निवेदन दिले. निवेदनात नमुद आहे की आमच्या मुलांना संबधीत शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनीच उत्तरपत्रिकेवर विशिष्ट प्रकारच्या खुणा करण्याची सुचना दिली होती. सदर चिन्ह न टकाल्यास अनुत्तिर्ण होण्याची भीतीसुद्धा संबधीतांकडून देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांंनी सुचनांचे पालन केले आहे. तसेच बोर्डाची चौकशीची नोटिस आल्यानंतर विद्यार्थ्यांंकडून पैशाची मागणीसुद्धा संबधीतांकडून केल्या गेली आहे. संबधीत विद्यार्थ्यांंचे पालकवर्ग अशिक्षित असून विद्यार्थी त्यांच्यावर अवलंबून असल्यामुळे विद्यार्थ्यांंचा सहानुभतीपूर्वक विचार करून संबधीत कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे. निवेदनावर शे.साबीर शे.कदीर, फरजाना बी शे.युनुस, हमीदा बी शे.बशीर, शबनम कौसर शे.निसार, नदीमखॉ बुढनखाँ, अरशद मुस्ताक पटेल, साहील मंजुर पटेल, रूबीना खलील पटेल या ९ विद्यार्थ्यांंसह त्यांच्या पालकांच्या व शे.कलीम शे.बिस्मील्लाह कुरैशी, शे.अलीम शे.सलीम कुरैशी, शे.अफसर शे.मेहबुब कुरैशी, शे.कलीम शे.गनी, शे.सलीम शे. उस्मान, शे. अलताफ शे. निसार, शे. अ.रशीद शे.अमीर, हारूण गफ्फार पटेल, अँड. वसीम अकरम कु रैशी, सै. इस्माईल उर्फ पठाण, ङ्म्री कृष्णाभाऊ भोरे, शे. मोहसीन शे.उस्मान, शे.अलीम शे.सलीम कुरैशी, अ.रउफ अ.गनी, शे.करीम शे.मासुम, सदील महेबुब ठेकेदार हय़ा इतर विद्यार्थ्यांंच्या पालकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. निवेदनाच्या प्रति उपसंचालक अमरावती, शिक्षणाधिकारी बुलडाणा व संस्थाध्यक्ष डॉ.जाकीर हुसेन उर्दू हायस्कुल धा.बढे यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.