शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान गरजेचे

By admin | Updated: July 1, 2016 00:16 IST

जिल्ह्यात खरीप पेरणीची लागवड वाढत आहे. परंतु बाजारातील असो की घरचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

कृषी तज्ज्ञांचा सल्ला : बियाण्यांची काळजी हवी, पट्टापेर पद्धती योग्य अमरावती : जिल्ह्यात खरीप पेरणीची लागवड वाढत आहे. परंतु बाजारातील असो की घरचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अपेक्षित उत्पन्न तेव्हाच मिळू शकते. बियाणे अधिक खोल पडणे, पाणी साचलेल्या जमिनीत पेरणी, पेरणीनंतर पावसाचा खंड योग्य निचरा न होणारी जमीन आदी कारणांमुळे बियाण्यांची उगवण शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात सोयाबीन हे खरिपाचे प्रमुख पीक आहे व खरीपाच्या एकूण क्षेत्राच्या ५० टक्के पेरणी क्षेत्र आहे. सोयाबीनची मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी व जमिनीच सामू ६.५ ते ७.५ असलेल्या जमिनीची निवड करावी. हलक्या, उथळ व क्षारयुक्त जमिनीवर सोयाबीनची पेरणी करू नये. सलग १० वर्षापासून सतत एकाच क्षेत्रात व एकाच वाणाचा उपयोग केल्यामुळे कीड व रोगांचा प्रकोप वाढतो व त्यासाठी सोयाबीन पिकाची कमी होत जाणारी प्रतिकारशक्ती कारणीभूत ठरते. सर्वसाधारणपणे सोयाबीन,मूग,उडीद या पिकांची बैलजोडीने पेरणी करायची झाल्यास तिनदाती तिफन अथवा काकटीने पेरणी करायची झाल्यास प्रत्येक वेळी परंतु येताना चौैथी ओळ रिकामी ठेवावी व या ओळीत डवराच्या फेटाच्या वेळी, डवरणी आटोपल्यानंतर लगेचच, केवळ दोरी बांधून डवऱ्याच्या सहाय्याने गाळ पाडून घ्यावा. प्रत्येक तीन ओळीमधून पीक गादी वाफ्यावर करून घ्यावे. टॅ्रक्टरद्वारे पेरणी करायची झाल्यास सात दात्याच्या पेरणी यंत्राने पट्टावेट पद्धतीने पेरणी करायची झाल्यास सात दात्याच्या पेरणी यंत्राने पट्टापेर पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणी यंत्राच्या बियाण्यांच्या कप्प्यातील चवथे छिद्र बंद करावे . प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येतांना एक ओळ खाली रेवावी (आठवी ओळ) म्हणजेच संपूर्ण शेतात प्रत्येक तीन ओळांना चौथी ओळ रिकामी राखली जाईल व प्रत्येक चौथ्या ओळीवर उवरणीच्या वेळी, उवरणी आटोपल्यानंतर एका डवऱ्याच्या सहायाने गाळ ओढून पट्टापेर पद्धतीने पीक गादी वाकयावर घ्यावा असा सल्ला शिवाजी कृषी महाविद्यालयाचे जितेंद्र दुर्गे व मनोज नवरे यांनी दिला आहे. पेरणीकरिता आणलेल्या बियाण्याची पिशवी खालून फोडावी बियाण्याची पिशीव पिशवीवरील टॅग जपून ठेवावी. साधारणत: ७५ ते १०० मि.म. पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पेरणी योग्य आलावा असतांनाच बियाण्याची पेरणी करावीे पेरणी योग्य ओलावा जमिन३ीमध्ये आहे किंवा नाही या करिता शेतातील मातीचा गोळा करावा तो व्यवस्थित घट्ट होतो की नाही दो पाहावा. तद्नंतर दूर फेकावा. तो गोळा फुटला असता पेरणी योग्य ओलावा नाही, असे समजावे. पेरणीपूर्वी बियाण्यास २-३ ग्राम कार्बोक्सिन ३७.५ व थायरम ३७.५ % (मिश्र घटक) या प्रमाणात लावावे. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर रायसोबियम जपोनिकम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू पी.एस. बी. २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावू नंतर पेरणी करावी. पेरणी सरत्याने करावी दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर ४५ बाय ५ से.मी. ठषवावे, भरघोस उत्पादनासाठी हेक्टरी झाडांची संख्या ४ ते ४.५ लाखापर्यंत ठेवावी. पेरणी उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम करावी. शेतकरी पेरणी योग्य जमीन तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करतात. यामुळे जमीन भुसभुशीत होते, अशा जमिनीत पेरणी ट्रॅक्टरने केल्यास बियाणे अधिक खोलीवर पडते. खोल पेरणीनंतर किंवा अधिक हाताळणी झाल्यास त्याची उगवण कमी होते, अशी माहिती प्रादेशिक संशोधन केंद्राचे योगेश इंगळे, मंगेश दांडगे यांनी दिली.पट्टापेर पद्धतीचे फायदे बियाण्यांचे प्रमाण कमी लागते, बियाणे खर्चात बचत होते, पेरणी लवकरच व सोईची होते, शेतात वेळोवेळी पेरफटका मारणे सोईचे होते, किडी व रोगांची निगारणी व निरीक्षण शक्य होते, प्रत्येक पट्ट्यात फवारणी योग्य रितीने करता येते, शेतात हवा खेळती राहते, सूर्यप्रकाशासाठीची स्पर्धा कमी होते, सरीच्या वाटे ओलीत करता येते, तुषार सिंचन करणे सोईचे होते. काठावरील ओळींना बॉर्डर इफेक्ट मिळतो, शेतात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे मुलस्थानी संवर्धन शक्य होते, प्रत्येक पट्ट्यात िपकाचे काटेकोर व्यवस्थापन शक्य होते, प्रत्येक पट्ट्यात पिकाची एकसमान वाढ मिळते, प्रत्येक पट्ट्यात पिकाची एकसमान वाढ मिळते, पिक गादीवाफ्यावर असल्यामुुळे पावसाचे पाणी व पिक यांचा सरळ संबंध टाळता येतो, मुलस्थानी पावसाच्या पाण्याच्या संवर्धनाचा माध्यमातून जमिनीतील ओल शेवटपर्यंत टिकवून ठेवल्यास मदत होते.