अमरावती : मराठी अक्षर वर्णानुसार वैध उमेदवारांची क्रमवारी लावण्यात आली. यामध्ये सपना ठाकूर यांना ८, रेखा तायवाडे २१, रिना नंदा ४७, तर गुंफाबाई मेश्राम यांना ३ मते मिळालीत. यात सर्वाधिक ४७ मते रिना नंदा यांना मिळालीत. उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी एकूण आठ उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उपमहापौरपदाकरिता महायुतीच्या छाया अंबाडकर, काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार तर बसपाचे दीपक पाटील हे तीन उमेदवार रिंगणात होते. यात छाया अंबाडकर यांना २१, दीपक पाटील ३ तर शेख जफर यांना ४७ मते मिळालीत. महापालिकेत ८७ सदस्य संख्या असून महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत जनविकास काँग्रेस व जनविकास आघाडीचे ७ तर भाजप गटात सामील दिनेश बूब हे तटस्थ राहिलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ नगरसेवकांनी महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान केले. तथापि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत हे सातही नगरसेवक तटस्थ राहिलेत. त्यामुळे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत १४ नगरसेवक तटस्थ तर जनविकासचे बाळसाहेब भुयार, अपक्ष नगरसेवक विजय नागपुरे हे सभागृहात गैरहजर राहिलेत. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विजयी झालेल्या महापौर, उपमहापौरांच्या नावांची घोषणा केली. नवनियुक्त महापौर नंदा आणि उपमहापौर शेख जफर यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. महापौर, उपमहापौर निवडणुकीला अनुसरुन शहराच्या राजकारणाला वेगळे वळण आले असताना रावसाहेब शेखावत आणि राष्ट्रवादीचे निष्कासीत प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्यात हातमिळवणी झाली. काँग्रेसचे २९ तर राष्ट्रवादी फ्रंटच्या १६ सदस्यांच्या भरोवशावर महापालिकेत धर्मनिरपेक्ष विचारसरणीची सत्ता कायम ठेवण्यात शेखावत आणि खोडके या दोन्ही नेत्यांना यश आले आहे.
महापौर, उपमहापौरांना समान मते
By admin | Updated: September 9, 2014 23:09 IST