शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

बी-टेकच्या विद्यार्थ्यांचा मास्टर मार्इंड प्लान

By admin | Updated: September 16, 2014 23:24 IST

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पूर्व परीक्षेची वेबसाईट हॅक करुन बिहार येथील बी-टेकच्या विद्यार्थ्यांनी हायटेक प्लॅन तयार करुन अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय

वेबसाईट केली हॅक : अनेक विद्यार्थ्यांना गंडविलेअमरावती : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पूर्व परीक्षेची वेबसाईट हॅक करुन बिहार येथील बी-टेकच्या विद्यार्थ्यांनी हायटेक प्लॅन तयार करुन अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात १० सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बिहार येथील रहिवासी आदित्य रतनेश्वर झा (२८), अभिषेक सूर्यकांत कुमार (२६), पप्पू राजकुमार सिंग (२०), सुजितसिंग पीरेन्दरसिंग (२१), दीपक दुर्गोनंद झा व सुरदेवसिंग लाबहादूर सिंग यांना अटक केली आहे. हिमाचल प्रदेश येथील रहिवासी अविनाश चंदेल यांच्या मुलीच्या वैद्यकीय प्रवेशकरिता आरोपीला २२ लाख रुपये दिले होते. मात्र प्रवेश निश्चित न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याची अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी पत्रपरिषदेत दिली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक गणेश अणे, प्रमेश आत्राम उपस्थित होते. आरोपी बिटेकचे विद्यार्थीहायटेक प्लान करणारे हे युवक उच्च शिक्षण घेत आहेत. आरोपींमधील दीपक झा हा फरिदाबाद येथील इंजिनीअरींग कॉलेजमध्ये बी-टेकचा विद्यार्थी आहे. सुरेदेव सिंग व अभिषेक कुमार हे दोघेही जयपूर येथील एका महाविद्यालयात बि-टेकचे शिक्षण घेत आहे. सुरजित सिंग हाही बी-टेक झालेला आहे, असे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.दोन मुख्य सूत्रधार या घटनेतील मुख्य सूत्रधार आदित्य रतनेश्वर झा व दीपक झा असून या दोघांनी हा मास्टर मार्इंड प्लान आखला होता. त्यामध्ये अन्य चार जणांना सोबतीला घेऊन विद्यार्थ्यांना गंडविणे सुरु केले. यामध्ये अन्य उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना हाती घेऊन मेडिकल प्रवेशाचे आमिष दाखविले. येथील डॉ. पजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील डिनचा पीए म्हणून सांगत होता. पीए बनून त्याने अविनाश चंदेल यांच्याही पैशाची बोलणी केली होती. त्यावेळी आदित्य हा पीएच्या तोऱ्यातच चंदेल यांच्यासमोर आला होता. दीपकने चंदेल यांच्याजवळून पैसे स्वीकारले.