शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

रेशन कार्डवरही मिळणार जीवनदायीचा लाभ

By admin | Updated: May 10, 2014 01:14 IST

आर्थिक दुर्बल कुटुंबांना दज्रेदार आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. याचा लाभ घेण्याकरिता जीवनदायी कार्डचे वाटप करण्यात आले;

अमरावती : आर्थिक दुर्बल कुटुंबांना दज्रेदार आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. याचा लाभ घेण्याकरिता जीवनदायी कार्डचे वाटप करण्यात आले; मात्र माहिती अपडेट न होऊ शकल्याने अनेकांना कार्ड मिळाले नाहीत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यावर उपाय म्हणून आता रेशनकार्ड व आधारकार्डवरही योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना दज्रेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने २१ नोव्हेंबर २0१२ पासून शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना लागू केली. या योजनेंतर्गत ९७१ प्रकारच्या शस्त्रक्रिया, औषधोपचार व १२१ तपासणी उपचारांचा लाभ घेता येणार आहे. जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबांना कार्ड वाटप करण्यात आले. या माहितीसाठी शिधापत्रिकेची माहिती ग्राह्य धरण्यात आली. मात्र, संबंधित विभागाने अशा कार्डधारकांची माहिती अपडेट केली नाही. ज्या कुटुंबांचा डेटा अपडेट केला; त्यातही मेळ नसल्याचे समोर आले. एका कुटुंबातील नावे दुसर्‍याच कुटुंबात गेल्याचे निदर्शनास आले. या कारणाने अनेकांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. याची दखल घेऊन शासनाने शिधापत्रिका व आधारकार्ड असतानाही योजनेचा लाभ देण्याच्या सूचना संबंधित कंपनी व जिल्हय़ातील रुग्णसेवा देणार्‍या रुग्णालयांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे आता रेशनकार्डधारकांनादेखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मात्र शिधापत्रिकेवर नोंदणीची तारीख असणे बंधनकारक आहे. ती नसल्यास तहसील कार्यालयात जाऊन तारीख नोंदवून घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.