संस्कार शिबिर : ज्ञानाई वारकरी बहुउद्येशीय संस्थेचा उपक्रम अमरावती : ज्ञानाई वारकरी बहुउद्येशीय शिक्षण संस्थाच्यावतीने आयोजित ज्ञानाई वारकरी बाल संस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना कीर्तनाचे धडे देण्यात आले. शुक्रवारी विद्यार्थ्यांनी कीर्तनाचे प्रात्याक्षिक करुन सर्वांचे मने जिकंली. ज्ञानबा तुकारामाचा यावेळी गजर करण्यात आला. ९ ते २९ मे दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी ४ वाजता शिबिर स्थळ ते संत गाडगेबाबा मंदिरपर्यंत वारकरी दिंडी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये १५० विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले होते. १२५ विद्यार्थ्यांनी सुसंस्काराचे धडे घेतले आहे. शिबिराला सचिन देव महाराज, श्यामसुंदर महाराज निचत, पुरुषोत्तम बोबडे, अरविंद देशमुख, सतीश महाराज कोहळा जटेश्वर, कैलाश महाराज राऊत, हरीश मोहड महाराज, देवेंद्र जुनघरे, उमेश आगरकर महाराज यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी शैक्षणिक, संस्कृत वाड:मय, बौध्दिक, सांस्कृतिक व शारीरीक व आध्यात्मिक धडे देण्यात आले आहे. हरिओम महाराज शास्त्री, पंकज महाराज पोहोकार, वंदना पराते नितीन शिरस्कर, जनार्धन वाठोकार, अरविंद गोसावी, अनुप देशमुख, वडुररकर महाराज, कथे महाराज, आदींचे मार्गदर्शन लाभले. व्यवस्थापक लाभेश महाराज बडगुजर, अमित चवरे, पुरुषोत्तम वडूरकर मंगेश कोल्हे आदी महाराजांचे सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना दिले कीर्तनाचे धडे
By admin | Updated: May 28, 2016 00:05 IST