शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
4
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
5
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
6
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
7
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
8
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
9
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
10
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
11
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
12
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
13
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
14
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
15
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
16
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
17
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
18
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
19
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
20
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय

कौंडण्यपूरचा पूल देतोय अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:19 IST

विदर्भातील प्रख्यात तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कौंडण्यापूर हे अमरावती- आर्वी राज्यमार्गावर असून, वर्धा जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथून वर्धा नदी वाहते. या नदीवरील २५० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे कठडे जीर्ण झाले असून, ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : सुरक्षा कठड्याचे लोखंडी पाईप झाले जीर्ण

सूरज दहाट ।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : विदर्भातील प्रख्यात तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कौंडण्यापूर हे अमरावती- आर्वी राज्यमार्गावर असून, वर्धा जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथून वर्धा नदी वाहते. या नदीवरील २५० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे कठडे जीर्ण झाले असून, ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे.चार दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एक माता आपल्या चिमुकल्या मुलासह पुलाखालून पाण्यात पडली होती. नदीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. पुलावरील लोखंडी पाईपाचे कठडे सुस्थितीत असते तर चिमुकल्याचा जीव वाचला असता, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.या नदीवर धामणगाव तालुक्यात बगाजी सागर हे धरण आहे. या धरणाचे बॅक वॉटर कौंडण्यपूर ते धामंत्रीपर्यंत पसरले असल्याने नदीच्या दुतर्फा भरपूर पाणी आहे. यंदा या धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने वर्धा नदीत सध्याही भरपूर जलपातळी आहे. या पुलाच्या पृष्ठभागाचे क्रॉक्रिट काही ठिकाणी उखडले आहे. त्यामुळे पाव किमी. लांबीच्या पुलासाठी हे खड्डे धोकादायक ठरणारे आहे. विशेष म्हणजे वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा अधोरेखित करणारा हा पूल आहे. या राज्यमहार्गावरून यवतमाळ- अमरावती व वर्धा या तिनही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक रात्रंदिवस सुरू राहत असल्याने या पुलाचे कठडे मजबूत असणे महत्त्वाचे आहे. पुलाची सुरक्षा कठडे अगदी ३ फुटांपेक्षा कमी असून, जीर्ण झालेले पाईपचे कठडे या पुलाला लावले आहेत. त्यामुळे या पुलाचे कठडे चार फुटांपेक्षा अधिक उंच व मजबूत बसविणे गरजेचे झाले आहे. या पुलावर रात्रीच्या वेळी अंधार राहत असल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता दिनकर माहुरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.वर्धा नदीचे घाटही असुरक्षितजिल्ह्यासह विदर्भात वर्धा नदीचे पौरानिक महत्व आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवाळीनंतर महिनाभर यात्रा असते. हजारो भाविक या नदीपात्रात स्रान करतात. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच तजविज जिल्हा व ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली नाही. विकास आराखड्याद्वारे अनेक कामे होत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कामे देखील होणे महत्वाचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. या नदी घाटावर दररोज विदर्भातील अनेक गावातून नागरिक अस्थिविसर्जनासाठी येतात. या दरम्यान अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहे. अस्थिविसर्जनासाठी असलेल्या लाकडी डोंग्यात देखील सुरक्षेची कोणतेही साधने नाही. स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने या घाटांवर देखी, सुरक्षेची साधने पुरविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.