शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

आंतर मशागतीच्या कामांना वेग

By admin | Updated: July 29, 2016 00:19 IST

जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला असून सर्वच शेतशिवार हिरवळीने फुलून गेले आहे.

पिकांची वाढ जोमदार : शेतकऱ्यांना कामांसाठी मिळेनात मजूर हिरापूर : जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला असून सर्वच शेतशिवार हिरवळीने फुलून गेले आहे. अधूनमधून पाऊसही हजेरी लावत असल्याने पिकांची जोमाने वाढ होताना दिसते. आता आंतर मशागतीच्या कामांनी वेग घेतला असून त्यामध्ये कोळपणी (डव्हरणी), निंदन, तणनाशक, कीटकनाशक फवारणींच्या कामांची लगबग सुरू आहे. मात्र शेतातील कामे करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. खरीप हंगामातील पिके ही मोसमी पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टासोबतच पावसाची साथ मिळणे गरजेचे आहे. मागील हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीला लावलेला खर्चदेखील निघालेला नाही. मात्र यंदा सुरुवातीपासूनच मोसमी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगले संकेत दिले. त्यामुळे काही तालुक्यांत मृग नक्षत्रातच पेरणीला वेग आला होता तर त्यानंतरच्या कालखंडात काही तालुक्यात पेरणीची कामे आटोपली मात्र त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक पावसाने शेतकरी वर्ग आनंदून गेला आहे. शेतातील पिकांची चांगली वाढ होत असल्याने आंतरमशागतींच्या कामांना वेग आला आहे. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे घरची मंडळीच सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतात राबत आहेत. त्यात सुटीच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांचीदेखील थोडीफार मदत होते. निंदणाच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी तणनाशक फवारणी करतात. मात्र फवारणीच्या कामासाठीदेखील पुरुष मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक नव्हे तोच दुसरे संकट उभे ठाकले आहे. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर) मजुरांची ने-आण शेतकऱ्यांकडे ग्रामीण भागातून दुसऱ्या गावातील शेतात मजूर न्यावयाचे झाल्यास शेतमालकाला या मजुरांची ने-आण करावयाची जबाबदारी घ्यावी लागते. सकाळी गावात वाहन नेऊन त्या ठिकाणाहून मजूर घेऊन शेतात जाणे. सायंकाळी काम संपताच मजुरांना रोख स्वरुपात मजुरी देऊन घरापर्यंत सोडावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक मजुरामागे किमान ५० रूपये खर्च येतो. मजुरीचे दर भिडले गगनाला मजुरीचे दर प्रत्येक गावात वेगवेगळे आहेत. शहरात वेगळे तर ग्रामीण भागात वेगळे आहेत त्यामुळे महिलांना निंदणीच्या मजुरीपोटी १०० ते १५० रुपयादरम्यान मजुरी मिळते तर पुरुषाच्या मजुरीचा दर हा कामावरून ठरलेला असतो. किमान १५० रुपयांपासून ते कमाल २५० रुपयांपर्यंत मजुरी द्यावी लागत आहे. परिणामी शेतात मजूर लावणेदेखील शेतकऱ्यांना कठीण जात आहे. मजुरांचे संघटन ग्रामीण भागात मजुरांचे संघटन केले जात आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे, तर मजुरांची संघटन करणारी व्यक्ती ही जास्तीत जास्त मोबदला देण्यास तयार असतो त्यामुळे बहुतांश मजूर अशा संघटनांमध्ये काम करण्यास तयार असतात व अधिक शेती असलेला शेतकरी एकाच दिवशी ५० ते १०० मजूर लावून कामे करून घेतात. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे.