शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

आसमंतात घातक वायूंचे ढग !

By admin | Updated: February 9, 2016 00:04 IST

अमरावतीकरांना ‘प्रदूषणा’ची समस्या काही नवीन नाही. वाढते ध्वनी, वायू प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्यावर वेळोवेळी चर्चा झडत असतात.

प्रदूषण ठरतेय प्राणघातक : औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे संशोधन संदीप मानकर अमरावतीअमरावतीकरांना ‘प्रदूषणा’ची समस्या काही नवीन नाही. वाढते ध्वनी, वायू प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्यावर वेळोवेळी चर्चा झडत असतात. परंतु वातावरणात किती घातक वायू पसरले आहेत. याची कल्पनाही सामान्यांना नसते. येथील शासकीय औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तीन वर्षे सतत धुलीकणांमधील घातक वायुंंवर अभ्यासपूर्ण संशोेधन करून सादर केलेल्या अहवालातून ही भयानकता स्पष्ट होते. वातावरणातील धुळीकणांमध्ये मागील तीन वर्षांत सल्फर आणि नायट्रोजन आॅक्साईडसह आरएसपीएमच्या (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर)प्रमाणात झालेली वाढ नाक, कान, घसा व छातीच्या वाढत्या आजारांसाठी कारणीभूत असल्याचे धक्कादायक तथ्यही या अहवालातून समोर आले आहे. शासकीय औषधी निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्नेहा रामकृष्ण तिडके व विभा अशोक रामटेके यांनी तीन वर्षे या विषयावर सतत अभ्यास केला. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणासाठी त्यांना विभागप्रमुख वैशाली नागुलवार यांचे मार्गदर्शन लाभले. उपरोक्त दोन्ही विद्यार्थिनींनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाकडून सन २०१३ ते २०१५ या तीन वर्षांची अभ्यासपूर्ण आकडेवारी गोळा केली. यामध्ये शहरातील विविध भागांतील हवेतील धुळीकणांचे नमुने घेऊन त्यावर संशोधन करण्यात आले. घातक आजारात वाढ, मनोविकाराचे १३२५ रुग्णअमरावती : यामध्ये व्हीएमव्ही परिसरातील रहिवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी), राजकमल चौकातील वाणिज्य क्षेत्राचे सर्वेक्षण केल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की, अमरावतीच्या धुळीकणांमध्ये आरएसपीएमचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. घातक वायुंच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन वर्षांत कान, नाक आणि घशाच्या आजारांनी बाधित तब्बल २,४३७ रुग्ण आढळले आहेत, तर छातीचे विकार (अस्थमा)ने २,२५६ रुग्ण हैराण आहेत. ८,३७२ लहान मुलांनाही विविध आजार घातक धुलिकणांमुळेच बळावल्याचे चित्र आहे. वातावरणातील धुलीकणातील घातक सल्फर व नायट्रोजन आॅक्साईडमुळे चक्क मनोविकराने बाधित १३२५ रुग्ण देखील आढळले आहेत. उपरोक्त अहवालातून पुढे आलेल्या निष्कर्षांवर आणि तथ्यांचे सखोल अध्ययन केले असता अंबानगरीतील वाढते प्रदूषण रोखण्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाची नेमकी भूमिका काय, हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. प्लास्टिकचा कचरा पेटवू नयेदररोज निघणाऱ्या घरगुती कचऱ्याचे प्रमाण मोठे असते. त्यात अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तुंचा देखील समावेश असतो. परंतु ज्या प्लास्टिक वस्तुमध्ये घातक सीएफसी (क्लोफ्लुरोकार्बन)चे प्रमाण आहे त्या वस्तू जाळल्याने वातावरणात घातक वायू पसरतात. त्यामुळे केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट महापालिकेनेच योग्य पध्दतीने लावावी. प्रदूषणामुळे होऊ शकतात हे आजारब्राँकायटिस, क्रॉरोनिक फ्रायब्रासीस, ब्रानकोनिमोनिया, त्वचेचे विविध आजार, अस्थमा, फुफ्फुस, मनोविकार आदी आजार यामुळे बळावू शकतात. लहान मुलांच्या आरोग्यावरही यामुळे मोठा दुष्परिणाम होतो.शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आजार वाढले आहे. अनेकांना श्वास घेताना त्रास होतो. -श्यामसुंदर निकम, अधीक्षक, सुपरस्पेशालिटी