शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
5
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
6
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
7
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
9
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
10
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
11
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
12
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
13
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
14
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
15
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
16
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
17
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
18
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
19
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
20
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील गाईड करतील पर्यटकांना मार्गदर्शन !

By admin | Updated: January 12, 2016 00:19 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाद्वारे मार्गदर्शक (गाईड) यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

निवासी प्रशिक्षण वर्ग : वन्यजीव विभागाच्या ५२ गाईड्सचा सहभाग अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाद्वारे मार्गदर्शक (गाईड) यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ५ ते १० जानेवारी दरम्यान पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेल्या हरिसाल येथील संकुलात हा निवासी प्रशिक्षण वर्ग पार पडला. या प्रशिक्षणवर्गाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग व अकोट वन्यजीव विभाग अशा तीनही विभागांचे एकूण ५२ गाईड उपस्थित होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी, गुगामलचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे, सिपनाचे उपवनसंरक्षक सुनील शर्मा, अकोटचे उपवनसंरक्षक उमेश उदल वर्मा यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान बीएनएचएसचे सहायक संचालक संजय करकरे यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संपूर्ण प्राण्यांची ओळख करून दिली. संपूर्ण अन्नसाखळीत वाघाचे महत्त्व आपल्या ओघवत्या शैलीत पटवून दिले. सकाळच्या सत्रात प्रत्यक्ष वाघाच्या अधिवासात संपूर्ण जैवविविधतेची माहिती दिली. यादरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पात रानपिंगळा हा दुर्मिळ पक्षीदेखील आढळला. तिसऱ्या दिवशी स्वप्निल सोनोने यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील औषधी वनस्पती व वाघाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. सहायक वनसंरक्षक शांतनिक भागवत यांनी 'मेळघाटातील पक्षी' या विषयावर सादरीकरण केले. वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थींना अकोट वन्यजीव विभागातील नरनाळा अभयारण्य तसेच पुनर्वसन झालेल्या क्षेत्रात वनभ्रमंती केली. सकाळच्या सत्रात फुलपाखरे व कोळी निरीक्षण करण्यात आले. जोकर, नवाब, लिंबाळी, हबशी, शेंदऱ्या, चिमी, टायगर यांसह २५ प्रकारची फुलपाखरे दिसून आलीत. पदभ्रमण करताना ज्यायंट वूड स्पायडर, जंपिंग स्पायडर, टनेल वेब स्पायडरसारखे कोळी यांचीही माहिती देण्यात आली. जंगल सफारीदरम्यान सांबर, गवा, चितळ या प्राण्यांचे तर सर्पगरुड, घोंगी खंड्या, छोटा नीळा खंड्या, वेडा राघू, नीलकंठ, धनेश, सोनपाठी सुतार, सूर्यपक्षी, चष्मेवाला, रामगंगा, शिंपी, सातभाई, नाचन, गप्पीदास, दयाळ, खाटिक, बुलबुल या पक्ष्यांच्या दर्शनाने गाईड सुखावले. शेवटच्या दिवशी सर्व गाईड प्रशिक्षणार्थींची लेखी चाचणी घेण्यात आली. संपूर्ण प्रशिक्षणात गाईड यांना जंगलात पर्यटकांना फिरवताना घ्यावयाची काळजी, शिस्त यावर अधिक भर देण्यात आला. प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रात सिपनाचे उपवनसंरक्षक सुनील शर्मा, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक अमलेंदू पाठक, सहायक वनसंरक्षक यशवंत बहाळे व वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांचे हस्ते मार्गदर्शकांना प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच भारतातील पक्षी व भारतीय प्राणी हे पुस्तक बक्षीस देण्यात आले. आभार प्रदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरतने यांनी केले. कार्यक्रमासाठी पाचही दिवस स्थानिक वनपाल श्रीमती मेश्राम, वनरक्षक रुपाली येवले, गिरगुने, मेटकर, वाहन चालक सय्यद हसाम व शेख तस्लीन यांनी योगदान दिले. (प्रतिनिधी)