जितेंद्र दखने - अमरावती कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचार्यांना ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत आदेश प्राप्त होताच जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल यांनी सोमवारपासून या आदेशाची स्वत:पासूनच अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे सर्वसामान्यांनाही जिल्हाधिकार्यांची क्षणात ओळख पटू शकेल.
विविध
शासकीय कार्यालयात कामाच्या निमित्ताने येणार्या नागरिकांना त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचार्यांची ओळख पटणे आवश्यक आहे. परंतु अनेक शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर असतानाही दर्शनी भागावर ओळखपत्र लावत नाहीत. एखाद्या नागरिकाने विचारणा केली असता शासकीय अधिकारी, कर्मचारी ओळख दाखवीत नाहीत. या पार्श्वभूमीवर सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना दर्शनी भागावर ओळखपत्र लावणे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बंधनकारक केले आहे. याबाबतचे लेखी आदेश ७ मे रोजी धडकताच जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी स्वत:पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे या आदेशांचे पालन त्यांच्या अधिनस्थ इतर अधिकारी व कर्मचार्यांना देखील करावे लागेल. (प्रतिनिधी)शासकीय