शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

‘गॅस’ ग्राहकांच्या हक्कांची पायमल्ली

By admin | Updated: October 28, 2015 00:26 IST

आजच्या काळात स्वयंपाकासाठी ‘एलपीजी गॅस’ जीवनावश्यक झाला आहे. घरपोच सिलिंडर न मिळाल्यास ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागतो.

नागरिकांना कायद्याचे संरक्षण : ग्राहक जागृतीची गरजअमरावती : आजच्या काळात स्वयंपाकासाठी ‘एलपीजी गॅस’ जीवनावश्यक झाला आहे. घरपोच सिलिंडर न मिळाल्यास ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागतो. रांगा लावून घरगुती गॅस सिलिंडर मिळवावे लागते. अशावेळी बहुतांश ठिकाणी गॅस ग्राहकांची कुचंबणा होते. हक्कांची जाणीवच नसल्याने त्यांच्या हक्कांची सर्रास पायमल्ली होताना दिसते. स्वयंपाकाचा गॅस योग्य वजनाचा, सुरक्षित आणि वेळेवर प्राप्त होणे, हा जसा ग्राहकांचा हक्क आहे. त्याचप्रमाणे फसवणूक झाल्यास ग्राहकांना न्यायालयातही जाता येते. ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार देणेही ग्राहकांना शक्य आहे. गॅस वितरकांसह गॅस नियंत्रक, अन्नधान्य वितरण अधिकारी ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांपर्यंतचा पर्याय तक्रारीसाठी ग्राहकांपुढे उपलब्ध असतो. घरपोच येणारे सिलिंडर योग्य वजनाचे नसल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे होत असेल तर नागरिकांनी विरोध करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकारने त्यांना कायद्याचे संरक्षण दिले आहे. वितरकाची कायद्याची मदत घेऊन तक्रार करता येते, हे ग्राहकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)तर कंपनीकडून नुकसान भरपाईसिलिंडर स्फोटामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यासग्राहक न्यायालयात जाऊ शकतो. कंपनीचा निष्काळजीपणा सिध्द झाल्यास कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते. सिलिंडरमुळे अपघात झाल्यास त्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला देणे बंधनकारक आहे. या घटनेबाबत पोलिसांनाही सूचित करावे. वस्तू घेणे बंधनकारक नाहीनवीन गॅस कनेक्शन घेताना वितरक सिलिंडरसोबत गॅसची शेगडी, तांदूळ, चहा पावडर, व्हॅक्यूम क्लिनर अशा वस्तू खरेदी करण्याची सक्ती करतात. असे आढळल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे संपर्क साधू शकतात. सिलिंडरला असते ‘एक्सपायरी डेट’गॅस सिलिंडर वापरण्याची अंतिम तारीख म्हणजे ‘एक्सपारी डेट’. त्या गॅस सिलिंडरमध्ये गॅसचा पुनर्भरणा किती तारखेपर्यंत करायचा, यासाठी ही तारीख महत्त्वपूर्ण असते. यानंतरही सिलिंडरमध्ये गॅस भरला जातो. असे सिलिंडर वापरण्यास असुरक्षित असतात. सिलिंडरच्या वरच्या भागात लोखंडी रिंग असते. हे रिंग चार लोखंडी पट्ट्यांच्या सहाय्याने जोडलेले असते. एका पट्टीच्या आतल्या बाजुस ‘एक्सपायरी डेट’ लिहिलेली असते. वर्षाच्या चार तिमाहींसाठी ‘एबीसीडी’ अशी मुळाक्षरे वापरून त्यापुढे वर्ष लिहिलेले असते. एखाद्या सिलिंडरवर ‘डी-२०१४’ असे अंकित असेल तर ते सिलिंडर सन २०१४ च्या शेवटच्या तिमाहीनंतर म्हणजे डिसेंबरनंतर वापरण्यात येऊ नये, असा संकेत असतो.