शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दाट धुक्यांचा प्रकोप, हजारो हेक्टरवरील सोयाबीन मलूल

By admin | Updated: September 7, 2015 00:23 IST

जिल्ह्यातील बहुतेक भागात शनिवारी पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे हजारो हेक्टरमधील शेंगा भरण्याच्या स्थितीतील सोयाबीन मलूल पडले आहे.

निसर्गापुढे शेतकरी हतबल : खोडअळी, चक्रभुंगा, मोझॅकपाठोपाठ नवे संकटगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यातील बहुतेक भागात शनिवारी पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे हजारो हेक्टरमधील शेंगा भरण्याच्या स्थितीतील सोयाबीन मलूल पडले आहे. यापूर्वी खोडअळी, चक्रभुंगा व पिवळा मोझॅकच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे पीक धोक्यात आले असतानाच आलेल्या या आकस्मिक संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यामध्ये सरासरी उत्पन्नात ५० टक्क्याने घट येण्याची शक्यता आहे. शनिवारी पहाटे जिल्ह्यात बहुतेक भागात दाट धुके पडले. सकाळी आठ वाजेपर्यंत हे धुके कायम होते. यानंतर दुपारपासून सोयाबीनच्या पिकाने माना टाकण्यास सुरूवात केली. धुक्याचा सर्वाधिक प्रकोप तिवसा तालुक्यात झाला. आसेगाव, अंजनगाव बारी येथील शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. संरक्षित सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या शेतामधील सोयाबीनदेखील धुक्याचे बळी पडले आहेत. वातावरणाचा बदल कारणीभूतअमरावती : आधीच धोक्यात आलेल्या सोयाबीन पिकावर या धुक्याच्या संकटामुळे शेतकरी मात्र कमालीचा अडचणीत आला आहे. जिल्ह्यात २७ दिवसापासून पावसाची प्रदीर्घ दडी आहे. पावसासाठी संवेदनशील असणारे सोयाबीन पीक यामुळे धोक्यात आहे. सोयाबीन फुलोऱ्यावर असताना व शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाची नितांत गरज असते. परंतु पावसाच्या खंडामुळे जिरायती क्षेत्रामधील आधीच धोक्यात आले आहे. सोयाबीनवर खोडमाशीची अळी व चक्रभुंगाची अळी यामुळे सोयाबीनचे रोप पोखरल्या गेले आहे, पिवळ्या मोझॅकच्या अटॅकमुळे पिवळे होऊन पानगळ व शेंगा कमकुवत होत आहे. त्यात आता सकाळचे दाट धुके व दुपारचे कडाक्याचे ऊन यामुळे सोयाबीनचे पीक अडचणीत आले आहे. धुक्याचा प्रादुर्भाव सिंचन असलेल्या सोयाबीनवरदेखील मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. अचानक आलेल्या संकटामुळे हजारो हेक्टरमधील सोयाबीन गारद झाले असताना कृषी विभाग गाफील आहे. ही ‘कॉम्प्लेक्स’ स्थितीसोयाबीन पिकावर खोडमासी व चंद्रभृगा तसेच पिवळा मोझॅकचा अटॅक यामुळे शेंगा पोचट, दाणे कमकुवत होतात यामुळे सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांनी कमी येण्याची शक्यता आहे. ही ‘कॉम्प्लेक्स’ स्थिती आहे. यात धुरळणीची भर पडल्याने सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. असे करावे व्यवस्थापनपाने मलून पडलेली असल्यास २ टक्के युरीया किंवा २ टक्के पोटॅशिअम नायट्रेट हे २ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून तातडीने फवारणी करावी, असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. असा झाला धुक्यांचा परिणामआपल्या भागात दाट धुके ‘फॉग’ हे ‘स्मॉग’ बनले आहे. धुवारणीनंतर सोयाबीनच्या पानावर दवबिंदू तयार होतात. प्रदूषण अधिक असल्याने दवबिंदूमध्ये कार्बनडाय आॅक्साईड व सल्फरडाय आॅक्साईडचे कण मिसळले जातात. हे आम्लधर्मीय असल्याने व पीएच तीन टक्क्यांपेक्षा कमी असल्यास सोयाबीनच्या पानांचे रंध्र दव शोषूण घेतात आणि झाड अचानक मलूल पडते, असे प्रादेशिक संशोधन केंद्राचे सोयाबीनरोगतज्ज्ञ योगेश इंगळे यांनी सांगितले. तिवसा तालुक्यात सोयाबीनच्या काही शेतांमध्ये पाहणी केली. मात्र, मोझॅक, खोडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला. धुक्यामुळे सोयाबीनचे पीक मलूल पडल्यास सध्या याबाबत सांगणे शक्य नाही. - दत्तात्रेय मुडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी. दोन दिवसांपासून अचानकपणे सोयाबीन सुकत आहे. स्प्रिंकलरने यापूर्वीच पाणी दिले. सोयाबीनवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.- सुरेश मुंधडा,शेतकरी, कुऱ्हा.