शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

पाच टक्केच वीज पोहोचते जमिनीवर

By admin | Updated: July 1, 2016 00:21 IST

वर्षभरात ३२ व्यक्ती त्यापेक्षा अधिक जनावरे वीज अंगावर पडल्याने मृत्यूमुखी पडले आहेत.

अमरावती : वर्षभरात ३२ व्यक्ती त्यापेक्षा अधिक जनावरे वीज अंगावर पडल्याने मृत्यूमुखी पडले आहेत. आकाशात चमकणारी वीज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जिला आपण थांबवू शकत नाही. अशावेळी एकच गोष्ट आपल्याला करता येईल, ती म्हणजे प्रक्रिया समजून घेणे आणि सर्तक राहून काही गोष्टींची काळजी घेणे. कारण भीती व अज्ञानापोटी आपत्तीमध्ये नुकसान करतात. पृथ्वीचा पृष्ठभाग हा निगेिटव्ह व वातावरण पॉझिटिव्ह चार्जड असते. पृष्ठभागावरून वातावरणात सतत इलेक्ट्रोन जात असतात. तर विजा पडल्या नाहीत तर पृथ्वी आणि वातावरणातले विद्युत समतोल पाच मिनिटांत संपून जाईल. विजांमुळे नायट्रस आॅक्ससाईड तयार होते. जे पिकासाठी खताचे काम करतात. आकाशातील वीज घरातील विद्युत प्रवाहासारखी असते. तिची तीव्रता त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक असते. (१०० मिलियन ते १ बिलियन) बरेचदा आपण एखाद्या प्लॅस्टिक खुर्चीवर बसल्यानंतर आपल्याला शॉक लागतो. कारण घर्षणामुळे विद्युत भार तयार होतो. आपण बसतो तेव्हा अर्थिंगमुळे तो भार जमिनीत जातो. असाच प्रकार आकाशात घडतो. पावसाळ्यापूर्वी एप्रिल ते जून महिन्यात सर्वाधिक विजा पडतात. याचे प्रमाण दुपारनंतर अधिक असते. वीज पडून मरण्याचे प्रमाण अधिक आहे. २००३ ते २०१५ दरम्यान देशात विजेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७१.४८ टक्के पुरुष, २८.५१ टक्के स्त्रिया आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील अशाच प्रकारचे प्रमाण दिसून येते. भारतात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक ३० ते ४४ या वयोगटातील आहे. त्यापाठोपाठ १५ ते २९ वर्षे आणि ४५ ते ५९ या वयोगटातील आहे. आकाशात अशी होते विजेची निर्मिती गरम तापलेल्या जमिनीवरुन हवा जेव्हा जाते तेव्हा ती गरम होते आणि हल्की झाल्यामुळे वर जाते. ही हवा थंड झाल्यावर पावसाचे थेंब तयार होतात. आणखी थंड झाल्यावर त्याचे हिमकण तयार होतात. थंड हवा वजनदार असल्यामुळे खालच्या दिशेने वाहू लागते.वरती जाणारा वारा आणि खाली येणारा वारा यामुळे पाण्याचे थेंब आणि हिमकण यात घर्षण होते. घर्षाणामुळे विद्युत भार तयार होतात. ऋणभार हिमकणासोबत खाली येतो आणि धनभार आभाळाच्या वरील भागात जमा होतात. जमिनीवर आभाळाच्या खाली विरुद्ध भार म्हणजे धनभार तयार होतो. हवा ही विद्युत रोधक असते. पण जेव्हा भार वाढत जातो तेव्हा हवेचे आयोनाझेशन होऊन ती विद्युत वाहक होते. दोन्ही भार एकमेकांकडे आकर्षित होतात आणि सर्वात जवळचा चांगला वाहक पाहून त्याठिकाणी वीज पडते. वीज कुठे पडणार हे जमिनीपासून काही फुटाच्या अंतरावर ठरते. विजेचे तापमान सूर्यापेक्षा प्रखर सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. ९५ टक्के विजा आकाशातच असतात. फक्त ५ टक्के विजाजमिनीपर्यंत पोहोचतात.विजा एकाच ढगामध्ये, दोन ढगात किंवा ढग आणि जमिनीमध्ये पडतात. जमीन आणि ढगामधील वीज सर्वात धोकादायक असते. पृथ्वीवर दर सेकंदाला ४० विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. एवढ्या मोठ्या तापमानामुळे हवा प्रचंड दबावाखाली प्रसरण पावते आणि मोठा आवाज होतो. खुल्या मैदानात वीज पडण्याचे सर्वाधिक प्रमाण जागतिक स्तरावर वीज प्रभावित व्यक्ती मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण फक्त १० ते ३० टक्के आहे. तसेच र्वरित वाचलेल्या लोकांवर दीर्घकालीन परिणाम झाले असते. त्यामुळे वीज प्रभावित व्यक्तींचा त्वरित इलाज केल्यास त्याचे प्राण वाचविता येतात. विजेचा आघात झालेल्या ठिकाणाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, सर्वात जास्त २६ टक्के प्रमाण हे खुल्या मैदानात, १६ टक्के झाडाखाली व १३ टक्के पाण्याजवळ आहे. साधारणत: ५६ टक्के वेळेस व्यक्ती एखाद्या ऊंच ठिकाणी (डोंगर) किंवा एखाद्या ऊंच वस्तुजवळ असताना दुर्घटना घडल्या आहेत. असे ओळखा विजेचे अंतर विजेचा प्रकाश आणि आवाज यात ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्ही विजेच्या कक्षेत असून तुम्हाला विजेपासून धोका आहे. तुमच्यावर वीज पडण्याची ८० टक्के शक्यता आहे. वीज तुमच्या आसपासच्या पाच किमी अंतरावर पडत आहे. अशावेळी सुरक्षित जागेचा आसरा घ्या. शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे. वीज कडाडत असताना अशी घ्यावी दक्षता - खुल्या मैदानात उभे राहू नका, विजा सर्वाधिक खुल्या मैदानात पडतात. - झाडाखाली उभे राहू नका. ऊंच ठिकाणी, झाडावर चढू नका. - विजेचा खांब, टेलीफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका. - गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते. - दोनचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जावे. अशावेळी वाहनातून प्रवास करू नये.- वाहनाच्या बाहेर थांबणे फारच आवश्यक असल्यास धातुचे कोणतेही उपकरण जवळ बाळगू नका. - एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र राहू नये. दोन व्यक्तीमध्ये किमात १५ फूट अंतर राहील याची काळजी घ्या. - धातुची दांडी असलेल्या छात्रीचा वापर करू नका. - विजेवर चालणारे यंत्र तसेच धातूपासून बनलेल्या वस्तू जैसे कृषियंत्र इत्यादीपासून दूर रहा. - प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका. मोबाईलचा वापर टाळा. आकाशात वीज कडाडल्यास ही घ्या काळजी- शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा. - शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा.- दोनही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा. - पायाव्यतिरिक्क्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. - ओल्या शेतात अथवा तालावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे. - पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे. - झाडापासून झाडाच्या ऊंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.- एखादे ऊंच झाड (जसे शेतातील बैठकीचे झाड) सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या ऊंच फांदीवर ताब्यांची एक तार बांधून तिचे दूसरे टोक जमिनीत खोलवर गाढून ठेवावे. - पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.- आपले घर, शेत इत्यादींच्या जवळपास कमी ऊंचीचे झाडे लावावीत. - जंगलात असाल तर कमी ऊंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा. - वृक्ष, दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा - मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा एखाद्या छोट्या झाडाखाली आसरा घ्यावा. असे शक्य नसल्यास जमिनीपासून खोलगट ठिकाणी गुडघ्यात वाकून बसा, जर आधीच खोलगट भागात असाल तर वरती येवू नका. ४चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच राहावे. वीज तीन प्रकारे करते आघात- विजा तीन प्रकारे आघात करू शकतात. एक तर ती सरळ अंगावर पडू शकते. अथवा ती बाजूच्या वस्तुवर पडल्यानंतर तिचा झोत अंगावर पडू शकतो. किंवा ती लांब कुठे तरी पडल्यावर जमिनीखाली असलेल्या तारा, पाईपद्वारे तिचा धक्का बसू शकतो. विजेविषयीचे गैरसमज आणि शंकानिरसन - वीज पडणे दैवी प्रकोप, पायाळू माणसावर विजा पडण्याची शक्यता असते. - वीज पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पायाळू माणसांना घालण्यात येणाऱ्या धातूच्या कड्यामुळे त्यांच्या अंगावर वीज पडते, विजा चमकत असताना धातुची वस्तू बाळगू नये.- गर्जना करणाऱ्या ढगाखाली असल्यास वीज पडते. -बऱ्याचदा वीज ढगाच्या वरच्या भागातून पडते, ती ढगापासून ३० ते ४० कि.मी. लांब अंतरावर पडते. - वीज एका ठिकाणी फक्त एकच वेळेस पडते. -वीज एकाच ठिकाणी अनेकदा पडू शकते. - वीजप्रभावित व्यक्ती त्वरित मरण पावतो. -वीजप्रभावित व्यक्तीचे मृत्युचे प्रमाण साधारणपणे ३० टक्के आहे. त्वरित प्रथमोपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकते.