शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

आॅनलाईन शॉपिंगवर सायबर चोरट्यांचा डोळा

By admin | Updated: May 9, 2015 00:29 IST

इंटरनेटमुळे व्यवहार करणे सुलभ झाले आहे. ही सुलभता आली असली, तरी अनेक धोकेही त्याबरोबर आले आहेत.

टोळी सक्रिय : सुलभतेसोबतच येतात धोके अमरावती : इंटरनेटमुळे व्यवहार करणे सुलभ झाले आहे. ही सुलभता आली असली, तरी अनेक धोकेही त्याबरोबर आले आहेत. चोरटेही आता या क्षेत्रात कार्यरत झाले आहेत. त्यांना केवळ ज्ञान मिळवून शिक्षण घेऊन घरबसल्या दरोडा टाकता येत असल्याने चोरीची पद्धतही बदलली आहे. शारीरिक कष्ट घेण्यापेक्षा चोरट्यांना आता केवळ वेबसाईट हॅक करण्याचे ज्ञान मिळविणे इतकीच तसदी घ्यावी लागत असल्याने या क्षेत्रातही चोरट्यांची संख्या वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आॅनलाईन खरेदीच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. आॅनलाईन म्हणजेच इंटरनेट शॉपिंग करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. घरबसल्या खरेदी असल्यामुळे बाजारातील गर्दी, वेळ आणि इंधनाची बचत होते; परंतु आॅनलाईन शॉपिंगबद्दल लोकांच्या मनात शंकाकुशंका वाढत आहे. अनेकांची यामुळे झालेली फसवणूक आणि आॅनलाईनची विश्वासार्हता यामुळे ग्राहकही अडचणीत येत आहेत. स्वस्तातले स्मार्टफोन व इंटरनेटमुळे सध्या खेड्यातील व्यक्तीही ब्राऊजिंग करून एकाच प्रकारातील शेकडो प्रॉडक्ट्स आॅनलाईन बघू शकतात. त्यामुळे पारंपरिक दुकानांमध्ये, स्टोअर्ससह मॉलमध्ये प्रत्यक्षात जाऊन होणारा वेळेचा अपव्यय टळू शकतो. आॅनलाईन रिटेलिंगमुळे खरेदीचा विस्तार झाला आहे. आॅनलाईन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठी खुले केले आहे. त्यामुळे जे लोक रिटेलिंगपासून दूर होते ते आता जवळ आले आहेत. आॅनलाईन रिटेलर्स ग्राहकांना काहीशा वाजवी दरात विविध वस्तूंची विक्री करतात. जे प्रॉडक्ट गावात मिळत नाही त्याचीही खरेदी करणे यामुळे शक्य झाले आहे. वेबसाईटमुळे आपण केव्हाही आॅनलाईन खरेदी करू शकतो. यामुळे जे लोक जायबंदी आहेत अशा लोकांनाही बसल्या जागी वस्तूंची खरेदी करता येते. तसेच खरेदी करण्यापूर्वी आपण इंटरनेटवर विविध प्रॉडक्ट्सबाबत संशोधन, तसेच त्यांच्या किमतीमधील तुलना करू शकतो, जे विविध दुकानांना, स्टोअर्सला प्रत्यक्ष भेट देऊन करून घेणे अवघड असते.आॅनलाईन खरेदीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. आॅनलाईन रिटेलर्स जरी पारंपरिक दुकानांच्या तुलनेत वाजवी दरात प्रॉडक्टस्ची विक्री करीत असले, तरीही त्या प्रॉडक्ट्सच्या दजार्बाबत आपल्याला कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. पारंपरिक दुकानांमध्ये जाऊन तुम्ही वस्तूची तत्काळ खरेदी करू शकता. याउलट वस्तू आॅनलाईन खरेदी केली, तर ती वस्तू घरी यायला काही दिवस लागतात. आॅनलाईन वस्तू परत करणे अवघड असते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाहतुकीचा खर्च द्यावा लागतो. दुकानांमध्ये वस्तू खरेदी करताना आपण ती वस्तू प्रत्यक्ष हातात घेऊन त्या वस्तूच्या दजार्बाबत खात्री करून घेत असतो. याउलट आॅनलाईन वस्तू जरी आकर्षक व चमकदार वाटत असली, तरीही प्रत्यक्षात ती तशी असेलच असे नाही. आॅनलाईन खरेदीमध्ये वाहतुकीच्या खचार्बाबत सुरुवातीला काहीच सांगितले जात नाही. नंतर मात्र हा 'शिपिंग'चा म्हणजेच वाहतुकीचा अतिरिक्त खर्च या वस्तूच्या मूळ किंमतीत धरला जातो. आॅनलाईन खरेदीत फसवणुकीची शक्यता जास्त असते. यात प्रॉडक्टस्ची विक्री करणाऱ्या तिसऱ्या पक्षाकडून खरेदीदारांची फसवणूक होण्याची संभावना असते. यात हे विक्रेते खरेदीदारांकडून वस्तूंचे पैसे स्वीकारतात; परंतु त्या वस्तू घरी पाठवीत नाहीत. त्यामुळे आॅनलाईन शॉपिंग कितपत योग्य याचाही विचार करायला हवा.सुरक्षित खरेदी केली पाहिजेज्या योजना अतिशय आकर्षक वाटतात त्यांची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. जर एखाद्या संकेतस्थळाबाबत खात्री वाटत नसल्यास मित्र, नातेवाईकांकडे त्याची चौकशी करा. इंटरनेटवर सर्च करून त्या साईटबद्दलची मते जाणून घ्या आणि नंतरच खरेदीचा बेत आखावा. नाही तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. ज्या वस्तू खरेदी करावयाच्या आहेत, त्याचे आधी पैसे भरू नका. वस्तू घरी आली की पैसे द्यावेत. तसेच आॅनलाईन पैसे भरण्यापूर्वी तुम्हाला पासवर्ड विचारला जातो जेणेकरून तुमची वैयक्तिक माहिती गोपनीय राहील. हा पासवर्ड निवडताना तुम्ही अक्षरे, अंक आणि चिन्हे यांची सरमिसळ केली पाहिजे. सार्वजनिक जागांवर वायफाय असलेल्या ठिकाणी आॅनलाईन खरेदी टाळावीच.