शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

‘अमृत’ योजनेतील कामांच्या निविदांना मुदतवाढ

By admin | Updated: August 27, 2016 00:10 IST

वाढत्या नागरी वस्त्यांचा वेध लक्षात घेता भविष्यात महानगरात उद्भवणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी....

८३.३३ कोटींची कामे : पाणी पुरवठ्याशी संबंधित प्रश्न सुटणारअमरावती : वाढत्या नागरी वस्त्यांचा वेध लक्षात घेता भविष्यात महानगरात उद्भवणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी ‘अमृत’ योजनेतून पाणी प्रश्न निकाली काढला जाणार आहे. त्याकरिता येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने विकासकामे मार्गी लावण्यासाठी निविदा प्रकाशित केल्यात. मात्र दोनच निविदा प्राप्त झाल्याने या प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे.राज्य शासनाने केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेतून पाणी पुरवठ्याची समस्या निकाली काढण्याचे ठरविले आहे. त्यानुसार राज्यात ४० शहरांचा ‘अमृत’ योजनेत समावेश करण्यात आला. अमरावती शहराचा समावेश या योजनेत आवर्जून करण्यात आला आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, आ. रवि राणा यांनी महानगरात अमृत योजना खेचून आणण्यासाठी शासनस्तरावर बरेच प्रयत्न केले आहेत. याची फलश्रूती म्हणजे अमरावतीत पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे करण्यासाठी ८३.३३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे त्वरेने करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आग्रह धरला होता. त्याअनुषंगाने मजीप्राने निविदा प्रक्रिया राबविली. परंतु दोन एजन्सीने आॅनलाईन निविदा सादर केल्या आहेत. आॅनलाईन निविदेत किमान तीन एजन्सींचा सहभाग असल्याशिवाय सदर निविदा उघडता येता नाही. त्यामुळे ८३.३३ कोटी रुपयांची विविध कामे सुरू करण्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. मजीप्राने मुदतवाढ देताना निविदाकर्त्यांना आठ दिवसांचा कालावधी दिला आहे. परिणामी १ सप्टेंबरनंतर ‘अमृत’ योजनेतून विकासकामे करण्यास किती एजन्सी पुढे येतात, हे स्पष्ट होईल. बडनेरा जुनीवस्ती अलमास बाबा दर्गाह परिसरात कालबाह्य झालेले जलकुंभ जमिनदोस्त करण्यात आले होते. वर्षभराचा कालावधी लोटला असताना बडनेऱ्यात नव्या जलकुंभाचे बांधकाम सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. परंतु ‘अमृत’ योजनेत बडनेरा येथे प्रस्तावित जलकुंभ निर्मितीचा यात समावेश करण्यात आला आहे. महानगरात ‘अमृत’ योजनचे काम मार्गी लावताना महापालिका प्रशासनाला २५ टक्के निधीचा हिस्सा या योजनेत भरावा लागणार आहे. दुसरीकडे शहरात पाणीपुरवठ्याची समस्या सुटावी, यासाठी स्वत: पालकमंत्री प्रवीण पोटे या योजनेवर लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे.महानगरातही होणार कामे महानगरात अमृत योजेनतून पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे करण्याचे प्रस्तावित आहे. सुमारे ८३.३३ कोटी रुपये खर्चून ही कामे केली जाणार आहेत. यात शहरात ५५० किमी लांबीच्या जलवितरण नलिका, ट्रिटमेंट प्लॅन्ट, ९ जलकुंभ, दोन टाक्या, तपोवन येथे जल शुद्धिकरण प्रकल्प, सिंभोरा येथे पंप बसविणे आदी कामे केली जाणार आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगातून दिलासाकेंद्र सरकारच्या अमृत योजनेत स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण रकमेच्या २५ टक्के निधीचा हिस्सा देणे अनिवार्य आहे. परंतु बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांना या योजनेत २५ टक्के निधीचा हिस्सा देणे कठीण आहे. त्यामुळे शासनाने २५ टक्के निधीचा अर्धा हिस्सा वित्त आयोगातून स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी महापालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळेल, असे संकेत आहेत.‘अमृत’ योजनेतून पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. मात्र यात दोनच निविदाकर्त्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे निविदेला आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु लवकरच कामे सुरू होतील.- प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता, मजीप्रा अमरावती