अमरावती : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने सेट परीक्षा (एम.एसईटी) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अमरावती येथील विविध केंद्र्रांवर २९ मे रोजी घेण्यात येणार आहे. यात विद्याभारती महाविद्यालय कॅम्प (कोड १७०१) या केंद्रावर ७९२ परीक्षार्थी, महिला महाविद्यालय जोग चौक (कोड १७०२) या केंद्रावर ३१२ परीक्षार्थी, न्युु हायस्कूल मेन, जोग चौक (कोड १७०३) या केंद्रावर २८८ परीक्षार्थी, नूतन कन्या शाळा, जोग चौक, (कोड १७०४) या केंद्रावर ३१२ परीक्षार्थी, पी.आर. पाटील कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, पोटे इस्टेट, कठोरा रोड (कोड १७०५) या केंद्रावर ५०४ परीक्षार्थी, प्रो. राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी, न्यु बायपास, बडनेरा (कोड १७०६) या केंद्रावर ५०४ परीक्षार्थी, प्रो.राम मेघे इंन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च बडनेरा (कोड १७०७) या केंद्रावर ६०० परीक्षार्थी, सिपना कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, बडनेरा रोड (कोड १७०८) या केंद्रावर ३३६ परीक्षार्थी, एच.व्ही.पी.एम. कॉलेज आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी, एच.व्ही.पी.एम.कॅम्पस (कोड १७०९) या केंद्रावर ६०० परीक्षार्थी, गोल्डन किड्स इंग्लिश प्रायमरी स्कुल गर्ल्स हायस्कुल जवळ (कोड १७१०) या केंद्रावर ५८९ परीक्षार्थी असे एकूण ४८३७ परीक्षार्थी केंद्रावर परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेसंदर्भात काही अडचण अथवा सूचना असल्यास विद्यार्थ्यांनी विजयकुमार चौबे, संपर्क प्रमुख, सेट परीक्षा केंद्र, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्याशी संपर्क साधावा असे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)
२९ मे रोजी सेट परीक्षा
By admin | Updated: May 26, 2016 01:18 IST