शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST

वीजवापराबाबत नकळत होणाऱ्या चुकांमुळे महावितरणकडून कारवाई होऊ शकते. अशा वीजचोरीबाबत प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये आर्थिक दंडासह काही वेळेला प्रकरणे पोलिसांत देण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये वीजचोरीच्या दहापटदेखील दंड वसूल केला जाऊ शकतो. अशा कारवाईपासून वाचण्यासाठी कुणीही विद्युत नियमांचे उल्लघंन करू नये.  वीज वापर कायदेशीर जेवढा होऊ शकेल, तेवढेच देयक भरावे आणि आत्मसन्मानाने जगावे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेजाऱ्याकडून अनधिकृतपणे वीज घेतली तरी ती चोरी ठरते. घरागुती वापराची वीज दुकानासाठी वापरली जात असेल, तर तोही गुन्हा ठरतो. जिल्ह्यात आतापर्यंत वर्षभरात १८६८ जणांवर वीज चोरीची कारवाई करण्यात आली आहे. वीजवापराबाबत नकळत होणाऱ्या चुकांमुळे महावितरणकडून कारवाई होऊ शकते. अशा वीजचोरीबाबत प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये आर्थिक दंडासह काही वेळेला प्रकरणे पोलिसांत देण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये वीजचोरीच्या दहापटदेखील दंड वसूल केला जाऊ शकतो. अशा कारवाईपासून वाचण्यासाठी कुणीही विद्युत नियमांचे उल्लघंन करू नये.  वीज वापर कायदेशीर जेवढा होऊ शकेल, तेवढेच देयक भरावे आणि आत्मसन्मानाने जगावे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

चोरी कळवा, १० टक्के रक्कम बक्षीस मिळवाजर एखाद्या नागरिकाने त्याला माहिती असणाऱ्या व्यक्तीची वीजचोरी पकडून दिली, तर त्याला वीजचोरीच्या दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जात असल्याची माहिती महावितरणने दिली. मात्र, त्या व्यक्तीला वीज चोरीचा फोटो काढून महावितरणच्या अधिकृत संकेत स्थळावर अपलोड करावा लागतो. त्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. 

कायदा काय सांगतो?विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ अंतर्गत जर महावितरणने एखाद्या ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित केला असेल, तर त्याने शेजाऱ्याकडून वीज घेणे गुन्हा ठरतो. असे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. ज्या कामासाठी वीज घेतली आहे, त्याचा वापर त्या कामासाठी न करता दुसऱ्या कामासाठी केला असेल, तर कारवाई केली जाते. मात्र, यामध्ये येथे एफआयआर दाखल करण्यात येत नाही. 

शेजाऱ्याकडून वीज घेणे किंवा वीजेचा वापर अन्य कारणासाठी करणे गुन्हा ठरतो. आमचे भरारी पथक आहे. ते कारवाई करतात. डिव्हिजननुसार पथके कारवाईसाठी सज्ज आहेत. - पुष्पा चव्हाण मुख्य अभियंता महावितरण अमरावती

 

टॅग्स :electricityवीज