शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

निवडणुकीचा विकास निधीला फटका

By admin | Updated: May 10, 2014 01:15 IST

राज्यातील सर्व आमदारांना आपआपल्या मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात २ कोटी इतका विकास निधी दिला जातो;

चांदूरबाजार : राज्यातील सर्व आमदारांना आपआपल्या मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात २ कोटी इतका विकास निधी दिला जातो; मात्र सन २0१४-१५ या आगामी आर्थिक वर्षात विधानसभेची निवडणूक अपेक्षित असल्याने या वर्षात केवळ विकासाकरिता सात महिन्यांचा अवधी मिळणार असल्याने स्थानिक विकास निधीत कपात करण्यात आली आहे. २ कोटीऐवजी १ कोटी १६ लाख ६६ हजार एवढय़ाच निधीवर आमदारांना आपल्या मतदारसंघाचा विकास करावा लागणार आहे. याबाबतचे निर्देश नियोजन विभाग मंत्रालयाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्तालयातील नियोजन उपायुक्तांना दिले आहेत.स्थानिक विकास वार्षिक कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील २८९ विधानसभा आमदार व ७८ विधान परिषद आमदार असे एकूण ३६0 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात स्थानिक विकास कामे करण्यासाठी सुमारे २ कोटी रुपये प्रत्येक वर्षाला देण्यात येतात. मात्र, सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ आक्टोबर २0१४ चे अखेर संपण्याची शक्यता लक्षात घेता नोव्हेंबर-डिसेंबर २0१४ मध्ये नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.ही बाब लक्षात घेता विद्यमान विधानसभेचा सन २0१४-१५ या आर्थिक वर्षातील कार्यकाळ एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या सात महिन्यांचा राहील. त्यामुळे विधानसभा सदस्यांना पहिल्या सात महिन्यांसाठी १ कोटी १६ लाख ६६ हजार इतका निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारांच्या १ कोटी १६ लाख ६६ हजार इतक्या निधीच्या विकास कामांनाच प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असून ही प्रशासकीय मान्यता देत असताना मागील वर्षातील स्लीपची रक्कम विचारात घेऊनच कामांना मंजुरी देण्यात यावी, असे निर्देश नियोजन विभाग मंत्रालयाने दिल्याची माहिती आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने २५ एप्रिलच्या पत्रान्वये लोकसभा निवडणुकीची राज्यातील आचारसंहिता अंशता शिथिल केल्यामुळे सन २0१४-१५ या वर्षातील आमदारांनी सुचविलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्या अनुषंगाने आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत निधीचे वितरण लवकरच वित्त विभागाच्या मान्यतेने करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)