शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आठ तालुके वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:28 IST

गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर पाच तालुक्यांसाठी २६९.६५ कोटींच्या मदतनिधीला शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये जिल्ह्यातील कमी पैसेवारीचा धारणी वगळता आठ तालुक्यांतील १०२० गावांसह दुष्काळसदृश स्थिती जाहीर १५ महसूल मंडळांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन टप्प्यांमध्ये व दोन हेक्टर मर्यादेत हा निधी वितरित होईल. यापैकी पहिल्या टप्प्याच्या ५५.२२ कोटींचा निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देपाच तालुक्यांना २७० कोटी : दुष्काळसदृश जाहीर १६ मंडळांसह १०२० गावांना डावलले

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर पाच तालुक्यांसाठी २६९.६५ कोटींच्या मदतनिधीला शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये जिल्ह्यातील कमी पैसेवारीचा धारणी वगळता आठ तालुक्यांतील १०२० गावांसह दुष्काळसदृश स्थिती जाहीर १५ महसूल मंडळांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन टप्प्यांमध्ये व दोन हेक्टर मर्यादेत हा निधी वितरित होईल. यापैकी पहिल्या टप्प्याच्या ५५.२२ कोटींचा निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे.जिल्ह्यात ३१ आॅक्टोबर २०१८ चे शासन निर्णयाप्रमाणे मोर्शी तालुक्यात तीव्र स्वरूपाचा व अंजनगाव सुर्जी, अचलपूर, वरूड, धारणी तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला. याव्यतिरिक्त ६ नोव्हेंबर २०१८ च्या निर्णयाप्रमाणे १६ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृशस्थिती जाहीर करून आठ प्रकारच्या सवलती देण्यात आल्यात. मात्र, या १६ महसूल मंडळांना दुष्काळ निधीमधून डावलण्यात आलेले आहेत. यंदाचा खरीप हंगाम बाधित झाल्याने धारणी वगळता जिल्ह्यातील १ हजार ८०५ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या पाच तालुक्यांव्यतिरिक्त १ हजार २० गावांना या मदतनिधीपासून डावलण्यात आल्याची बाब आता स्पष्ट झालेली आहे.शेतीपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्रात दोन हेक्टर मर्यादेत दोन टप्प्यात मदतनिधीचे वाटप होणार आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे प्रतिहेक्टर सहा हजार ८०० रूपयांच्या ५० टक्के म्हणजेच ३ हजार ४०० रूपये प्रति हेक्टर किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम अधिक असेल ती रक्कम पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे.बहुवार्षिक पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्यास प्रतिहेक्टर देय १८ हजार रूपयांपैकी पहिल्या टप्प्यात ९ हजार किंवा किमान दोन यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती पीक बाधित शेतकºयाला प्रदान करण्यात येणार आहे. ही मदत दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच देण्यात येणार असल्याचे महसूल विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.दुष्काळी तालुक्यांना निधी जाहीरमदतनिधीतून कर्जकपात नाहीमदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यामधून कोणत्याही बँकेला कुठल्याच प्रकारची वसुली करता येणार नसल्याची बाब महसूल विभागाने स्पष्ट केली आहे.बहुवार्षिक पिकांसाठी ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याची खातरजमा पंचनाम्याम्याद्वारे करण्यात येईल. मात्र, यासोबत जीपीएस इनबिल्ट फोटो आवश्यक राहणार आहे.३३ टक्के बाधित क्षेत्र ठरविण्यासाठी अंतिम पैसेवारीसाठी झालेल्या पीक कापणी प्रयोगातील उत्पन्नाचा आधार घेतला जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतनिहाय काढण्यात आलेले उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहेत.१ हजार २० गावांवर अन्यायदुष्काळाच्या नव्या संहितेनुसार शासनाने ३१ आॅक्टोबरला जिल्ह्यातील धारणी, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, वरूड व मोर्शी तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. याच गावांना मदतनिधी मिळेल. ६ नोव्हेंबरला ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाच्या आधारावर १५ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली. या मंडळांना यातून डावलले. याव्यतिरिक्त कमी पैसेवारीच्या पाच दुष्काळ तालुके वगळता उर्वरित नऊ तालुक्यांतील १०२० गावांना मदतनिधीतून डावण्यात आलेले आहे.