अमरावती : शहरात सोमवारी गणेश विसर्जनाची धामधूम सुरु होती. लहानांसह चिमुकलेसुध्दा बाप्पाला ढोल-ताशांच्या निनादात निरोप देत होते. सगळीकडे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानासुध्दा सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वडाळी येथील प्रथमेश तलावानजीकच्या डब्बर खदान डोह येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. अजय संजय कन्नाके (१८, रा.महादेव खोरी) असे मृताचे नाव आहे.अजय कन्नाके हा सावित्रीबाई फुले महाविद्यालयात इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता. त्याच्या मित्रांसोबत तो खदान डोह येथे गणपती मूर्ती विसर्जनासाठी गेला होता. उत्साहात गणेशमूर्ती विसर्जन सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. क्षणात दु:खाचे सावट, पानबुडेंनी काढला मृतदेहसोमवारी तो घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी त्याचे दोन सहकारी मीत्र शुभम राऊत व शुभम केने प्रथमेश तलावाशेजारी असणाऱ्या डब्बर खदान येथे गेला होता. तेथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. तेथे नागरिक गणपति विसर्जन करीत असल्याचे पाहून दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. असे असतानाही गणपतीची आरती झाल्यानंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी अजय डोहात उतरला. पंरतु त्याचा डोहात बुडून मृत्यू झाला. याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक रियाजोद्दीन देशमुख हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस विभागाचा पानबुडे अमर बगेल याने डोहात उडी घेऊन अजय कन्नाके याचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी अजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद केली.
विसर्जन करताना विद्यार्थ्याला जलसमाधी
By admin | Updated: September 8, 2014 23:28 IST