शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

भूकंपामुळे 'लँगटँग' पर्वताची उंची घसरली

By admin | Updated: May 14, 2015 23:59 IST

भूकंपामुळे हिमालयावरील लँगटँग पर्वताची उंची एक मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अहवाल युनायटेड स्टेट्सचे भूर्गभशास्त्र संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी केले आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीहिमालयन थ्रस्ट फॉल्टमुळे नेपाळ येथे भूकंपाचे तीव्र हादरे जाणवले. या भूकंपामुळे हिमालयावरील लँगटँग पर्वताची उंची एक मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अहवाल युनायटेड स्टेट्सचे भूर्गभशास्त्र संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी केले आहे.भारताचा भूगाग दरवर्षी ४.५ से.मी.ने पश्चिम-पूर्व बाजूने सरकत आहे. तसेच युरेशियन भूगाग हा भारताच्या भूभागकडे सरकत असल्याची निरीक्षणे संशोधकांनी नोंदविली आहेत. दोन्ही भूगाग एकेमकांना ढकलत असल्यामुळे मधल्या भूभागावर दाब निर्माण झाला आहे. दोन्ही भूगाग एकमेकांकडे सरकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसणे ही अपेक्षित आणि नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे मत भूगर्भशास्त्र संशोधकांचे आहे. या प्रक्रियेला संशोधक 'टेक्टॉनिक अ‍ॅक्टिव्हिटी' असे संबोधतात. ४० ते ५५ मिलीयन वर्षांपूर्वीपासून भारताचा भूगाग ५ हजार किलोमीटरने सरकल्यावर युरेशियन भूगागाला जाऊन टेकला. त्यामुळे हिमालय पर्वतरांगांसोबतच तिबेट व नेपाळचाही भूभाग तयार झालेला आहे. नेपाळमधील काठमांडू दाबपट्ट्यातील प्रदेश असून तेच भूकंपाचे मुख्य केंद आहे. भूकंप केंद्रबिंदूच्या पूर्वेकडे ८ हजार ८४८ मीटर उंचीचा एव्हरेस्ट पर्वत आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांवर लँगटँग व गणेश हिमल नावाचा भाग आहे. काठमांडू व अन्य ठिकाणी झालेल्या भूकंपानंतर संशोधकाने जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून हिमालयाची उंची जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये लँगटँग पर्वताचा ८० ते १०० किलोमीटरच्या भूगागाची उंची १ मीटरने कमी झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष संशोधक रेचर्ड ब्रिक्स यांनी नोंदविला. गणेश हिमलची उंचीसुध्दा एक ते दीड मीटरने कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज जर्मन एअर स्पेस सेंन्टरचे संशोधक स्वीस्टीयन मिनेट यांनी वर्तविला आहे. मात्र, एव्हरेस्टच्या उंचीबद्दल अद्यापपर्यंत संशोधकांनी काही निष्कर्ष काढला नसून त्यावर संशोधन सुरू आहे, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख सैय्यद खादरी यांनी दिली. खादरी हे भूगर्भशास्त्राचे आंतरराष्ट्रीय संशोधक आहेत. ४० ते ५५ मिलियन वर्षांपूर्वी नार्थ इंडियन प्लेट युरेशियन प्लेटला जाऊन टेकल्याने हिमालयासह नेपाळ व तिबेटची निर्मिती झाली. भारताचा भूगाग दरवर्षी ४.५ से.मीटरने सरकत आहे. ही प्रक्रिया निरतंर सुरुच आहे. त्यामुळे नेपाळ व भारतामध्ये भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. 'थ्रस्ट फॉल्ट'मुळे दोन्ही भूगागाच्या सीमांवर दबाव वाढत असल्यामुळे भूकंपाचे हादरे बसत आहेत. - सैय्यद खादरी, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.