शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

अवकाळी पावसाने खरिपावर रोगांचे संकट !

By admin | Updated: May 16, 2015 00:47 IST

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात अवकाळीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे शेती मशागतीमध्ये अडचणी येत आहेत.

तीन वर्षांची स्थिती : रबी हंगामानंतर जमीन तापत नसल्याने विपरीत परिणामगजानन मोहोड अमरावतीगेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात अवकाळीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे शेती मशागतीमध्ये अडचणी येत आहेत. मशागतीनंतर किमान दोन महिने जमीन पुरेशी तापायला हवी. परंतु अवकाळी पावसामुळे जमीन तापण्यास पुरेसा अवधी मिळत नाही. परिणामी मातीचा पोत खराब होत आहे. यामुळे किडी, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम खरिपाच्या उत्पादनावर होऊ शकतो, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरपासून अवकाळी पाऊस व गारपीटीचे सत्र सुरु आहे. विशेष म्हणजे २०१३ च्या मे अखेर ७६ मि.मी., २०१४ च्या मे अखेर १७० मि.मी. व यंदा १३ मेपर्यंत ९८ मि.मी. अवकाळी पाऊस पडला. यामुळे गहू, हरभरा व संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वातावरणातील बदलाचा परिणाम निसर्गासह, शेतजमिन, पशुपक्षी व मानवी जीवनावर होत आहे. निसर्ग नियमानुसार वर्षाचे पावसाळा, हिवाळा व उन्हाळा असे तीन ऋतू आहेत. परंतु निसर्गाचे चक्रच सध्या बदलेले आहे. मे महिन्यांपर्यंत अवकाळीचे थैमान असते तर जून महिन्यात पेरणीच्या काळात दोन महिने पावसाचा पत्ताच नसतो. पावसाळ्यात उन्हाची तीव्रता जाणवते तर उन्हाळ्यात पावसाळ्याचा भास होतो. यामुळे पिकांचीही शाश्वती नाही. अवकाळी पाऊस मान्सूनसाठी बाधक उन्हाळ्यात येणारा अवकाळी पाऊस हा मोसमी वाऱ्यांसाठीही बाधक ठरणारा आहे. तापमान वाढल्याने कमी दाबाचा पट्टा तयार होतो. परंतु कमी-अधिक तापमान राहिल्यास त्याचा परिणाम पुढे सरकणाऱ्या प्रक्रियेवर होत असतो. इशान्य-नैर्ऋत्य पाऊस खेचण्यासाठी पोषक वातावरण लागते. अवकाळीने जमीन तापत नाही तसेच बाष्पीभवनही कमी प्रमाणात होते. त्यामुळे पाऊस लांबणीवर जातो. पावसाचे उशिरा होणारे आगमन ही त्याचीच प्रतिक्रिया असते. यालाच ऋतुमान बदल असेही आपण म्हणू शकतो. हा बदल अहितकारी आहे, अशी माहिती कृषितज्ज्ञांनी दिली. जमिनीच्या आरोग्यावर परिणामएप्रिलमध्ये शेतीची मशागत होऊन मे अखेरपर्यंत ती तापायला हवी. यामुळे जमिनीत असलेले सुप्तावस्थेतील कीटक बाहेर पडून नष्ट होतात. परंतु अवकाळीमुळे त्यांना अनुकूल परिस्थिती लाभत आहे. त्यामुळे पिकांवर बुरशी, अळयांचा प्रादुर्भाव वाढतो. वैशाखातील ऊन जमिनीला मिळणे आवश्यक आहे. परंतु गेल्या ३ वर्षांपासून एप्रिल व मे महिन्यांत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तर कधी गारपीट असल्याने जमीन तापत नाही. त्यामुळे कीड नष्ट होत नाही. याचा जमिनीच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो.जमिनीलाही हवी विश्रांतीजमिनीच्या विश्रांतीचा काळ हा मार्च ते मे अखेरपर्यंत असतो. या काळात जमिनीचे तापमान वाढलेले असते. यामध्ये जर अवकाळी पाऊस पडला तर मातीमधील वेगवेगळ्या प्रकारचे अंडीकुंज नष्ट होत नाहीत. त्यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होतो. जमीन मशागतीला पुरेसा अवधी मिळत नाही. जमीन थंड-गरम होत राहिल्याने जमिनीचा पोत खराब होतो.