शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

भूदान मंडळाच्या कामात शासनाचा खोडा

By admin | Updated: May 22, 2016 00:02 IST

महसूल विभागाने मागील महिन्यात ७ सदस्यीय समितीचे गठन करून यापूर्वीच्या भूदानयज्ञ मंडळाला निष्फळ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरी समिती नियुक्त : शासन काय साध्य करणार !अमरावती : महसूल विभागाने मागील महिन्यात ७ सदस्यीय समितीचे गठन करून यापूर्वीच्या भूदानयज्ञ मंडळाला निष्फळ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही समिती भूदानसी यापूर्वी कधी नाळ जुळलीच नसल्याने यामधून कितपत साध्य होईल, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. शासनाद्वारा १७ फेब्रुवारी २०१६ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४ व मध्यप्रदेश भूदानयज्ञ अधिनियम १९३५ या कायद्याखालील जमिनीसंदर्भातील शासनाच्या भूमिका ठरविण्यासाठी व अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठित केली आहे. या समितीत सदस्य म्हणून वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, वने व महसूल विभागाचे उपसचिव, पुणे, नाशिक व नागपूर येथील विभागीय आयुक्तांचा या समितीत समावेश आहे. आचार्य विनोबा भावेंच्या भूदान यज्ञात मिळालेली ही जमीन खासगी मालमत्ता असून शासनाला या जमिनीशी काही देणे-घेणे नाही. मुळात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगणमताने या जमिनीचा भोगवटदार वर्ग २ बदलून विक्री होत असल्याचे समजते. केव्हा सादर होणार अहवाल ?अमरावती : शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या कार्यकाळ हा तीन महिन्यांचा आहे. १७ मे २०१६ रोजी या समितीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. यातील महिन्यात समितीची एकही बैठक झालेली नाही. नवनियुक्त समितीचे सचिवस्तरावर सर्व अधिकारी एसीत बसणारे आहे. याची समितीची जमिनीशी कधी नाळ जुळलीच नाही. तपत्या उन्हात हे अधिकारी भूदान व ग्रामदान जमिनीचा शोध कसा घेतली की टेबलवर बसून शासनाला अहवाल सादर करतील, यावर शंकाच आहे.समिती बेकायदेशीर, मंडळाचा आरोपभूमिहीन व शेतमजुरांनाच ही जमीन मिळाली पाहिजे, असा स्वतंत्र नियम भूदान यज्ञ मंडळाने केला आहे व या कायद्याला शासनाची मान्यता आहे. त्यामुळे शासनस्तरावर भूदान जमिनीचा निर्णय घ्यायचा अधिकार शासनास नाही, असे असताना ज्या भूदान मंडळाची जमीन आहे. त्या मंडळाला विश्वासात न घेता परस्पर शासनस्तरावर समिती नियुक्त करणे गैर असल्याचा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. कार्यकाळ संपला तरी समितीची बैठक नाही१६ फेब्रुवारीला गठित समितीचा तीन महिन्यांचा कार्यकाळ हा १७ मे रोजी संपुष्टात आहे. दरम्यान समितीची एकही बैठक झाली नाही. भूदान जमिनीसंदर्भात धोरण ठरविण्यासाठी शिफारसी या समितने केल्या नाही. त्यामुळे समितीचे गठण हा शासनाचा ‘फार्स’ ठरला आहे. भूदानची जमीन ही खासगी मालमत्ता असल्याने या जमिनीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार शासनाला नाही. मंडळाला विचारात न घेता शासनाने परस्पर नियुक्त केलेली समिती नियमबाह्य आहे. - आचार्य हरिभाऊ वेरुळकर,अध्यक्ष, भूदान यज्ञ, मंडळ