व्यापारी संकटात : राजुऱ्याचा मिरची बाजार थंडसतीश बहुरुपी - राजुराबाजारवरुड तालुक्यात मिरचीचे मोठ्या प्र्रमाणात उत्पादन घेतले जात असून यावर्षी संततधार पावसामुळे मिरची उत्पादकांना फटका बसला. अज्ञात रोगाने आक्रमण केल्यामुळे मिरचीचे पीक संकटात आले. यंदा राजुऱ्याच्या मिरची बाजारात मिरचीची आवक घटल्याने याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. शेकडो हेक्टर जमिनीतील मिरचीची झाडे उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.शेकडो क्विंटल मिरची राजुऱ्याच्या मिरची बाजारात येते. परंंतु मिरची कच्चा माल असल्याने उरल्यास तो परत नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. यामुळे मिळेल त्या भावात मिरची विकून मोकळे व्हावे लागते. रात्रीला भरणारा हा एकमेव बाजार आहे. मिरचीची देवाण-घेवाण करणारी राजुराबाजारची बाजारपेठ प्रसिध्द आहे. परप्रांतातसुध्दा मिरचीला भरपूर मागणी असते.
बुरशीजन्य रोगाने मिरची पीक ध्वस्त
By admin | Updated: September 13, 2014 23:32 IST