शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

सिंचन प्रकल्पांच्या जलपातळीत घट

By admin | Updated: April 19, 2015 00:19 IST

वरुड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

प्रकल्पात २५ ते ३० टक्केच जलसाठा : नद्याही पडल्या कोरड्यावरूड : वरुड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळ्यात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु आॅगस्टनंतरच पावसाने दडी मारल्याने जानेवारीपर्यंत वाहणाऱ्या नदीचा प्रवाहसुध्दा खंडित झाला आहे. पाणी वापर संस्थांनी वेळेआधीच पिकांना पाणी सोडण्यासाठी मागणी केल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठा कमालीचा घटला आहे. तापत्या उन्हामुळे तापमानाच्या फरकाने प्रकल्पात केवळ २५ ते ३० टक्के जलसाठा आहे. येत्या काळात तीव्र पाणी टंचाईचे सूतोवाच सिंचन विभागाने केले आहे. शेकदरी प्रकल्प व पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर एवढी आहे. पुसली प्रकल्पात जलसंचय क्षमता १००.६० मीटर असून ओलीत क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पात पूर्ण जल संचय क्षमता ४६१.७७ मीटर असून ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयन क्षमता ५००.७५ मिटर तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगाव प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता ४८०.५० मिटर आहे. ओलीत क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर ,जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर ,बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर,लोणी धवलगीरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे आहे. वघाळ बंधारा असून ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. सिंंचन व्यवस्थापन शाखा वरुडच्या कक्षेत येत असलेल्या सिंंचन प्रकल्पाची ओलीत क्षमता ५ हजार १५५ हेक्टरची असून सिंंचन क्षेत्र २ हजार ३५० हेक्टर ओलीत क्षेत्र आहे. परंतु यावर्षी आॅगस्टमध्ये सर्व प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होता. नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने आणि तापमानात वाढ झाल्याने जलसाठा कमी होऊन नोव्हेंबरमध्ये केवळ ८५ टक्के होता. जानेवारीत ७० टक्के, फेब्रुवारीत ६० ते ६५ टक्के आणि मार्चमध्ये ३० ते ४० टक्के परंतु एप्रिलमध्ये तापमानात वाढ झाल्याने सदर जलसाठा केवळ २५ ते ३० टक्क्यांवरच आला आहे. त्यामुळे नद्यासुध्दा कोरड्या पडल्या आहेत. रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणी वापर संस्थांना पाणी द्यावे लागते तर नद्यांनासुध्दा पाणी सोडले होते. या व्यतिरिक्त काही गावांना पिण्याकरिता पाणीपुरवठासुध्दा केल्या जातो. याव्यतिरिक्त पाकनाला प्रकल्पाला दरवाजा बसलेला नसल्याने तांत्रिक दोषामुळे जलसंचयन होवू शकले नाही. नागठाणा-२,मध्ये पाणी साठविणे सुरु आहे. तालुक्यातील १४ पाणी वापर संस्था असून विदर्भाचा कॅलीफोर्निया असलेला वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी सिंंचनाकरिता आवश्यक व्यवस्था नसल्याने हवालदिल झाले. पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. तालुक्यात २३ हजार ५०० हेक्टर शेतजमिन संत्रा लागवडीखाली असून यापैकी १६ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी संत्रा झाडे आहे. रबी हंगामातील गहू, चना व संत्रा आणि कपाशी, मिरची आदी बागायती पिके घेण्यात येते. अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणी पुरवठ्यात तूट येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)