शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

कडधान्याची पिके गेली, फळबागालाही फटका

By admin | Updated: July 15, 2014 23:54 IST

जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाला मंगळवारपासून प्रारंभ झाला असला तरी कडधान्य पेरणीचा काळ निघून गेल्याने पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उशिरा आलेल्या

चांदूरबाजार : जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाला मंगळवारपासून प्रारंभ झाला असला तरी कडधान्य पेरणीचा काळ निघून गेल्याने पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उशिरा आलेल्या पावसाचा फटका फळबागांनाही बसला आहे.शासनाने शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांनी अल्पावधीत व रोखीचे पीक म्हणून सोयाबीनची पसंती केली. मात्र या पिवळ्या सोन्यालाही पावसाअभावी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन हे ९० दिवसांचे पीक आहे. कमाल १५ जुलैपर्यंत सोयाबीनचे पीक जमिनीत पडले पाहिजे. त्यानंतर पेरल्या गेलेल्या सोयाबीनचे उत्पादन अपेक्षित प्रमाणात येत नाही, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ सोयाबीनचे महागडे बियाणे असूनही ते आता पेरणी करु शकणार नाहीत. मृगात सोयाबीनची पेरणी झाल्यावर जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोयाबीनला पूरक पाऊस व हवामान मिळत असते. त्यानंतरच या पिकाचा भरघोस उत्पन्नाची हमी असते. हा अनुभव शेतकऱ्यांना गेल्या वर्षांच्या सोयाबीन उत्पन्नातून आला. नेत्यांना मात्र विधानसभा निवडणुकीचे वेधएकीकडे बळीराजा पावसाच्या एकाएक थेंबासाठी तरसतो आहे तर दुसरीकडे राजकीय पक्षांची नेते आपली विधानसभेची ‘फिल्डींग’ लावण्यात व्यस्त असल्याचे दिसते. देशाला श्रीमंत व जिवंत ठेवणारा बळीराजा कर्जाच्या ओझ्याखाली पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जगात असा कोणताच वर्ग, व्यवसाय, क्षेत्र नाही की जे एका बियाणापासून कोट्यवधी बियाण्याची उत्पादन करते. ज्यातून तो स्वत:ची व इतरांच्या पोटाची खळगी भरत असेल. परंतु शेती व्यवसायातून एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. इतर वेळी आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबाचे सात्वन करण्यासाठी जाणारे नेते आता आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा तरी देणार आहेत का? ही पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे.