शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

वातावरणातील बदल ठरताहेत घातक

By admin | Updated: May 17, 2015 00:46 IST

वातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे.

कधी आभाळ तर कधी उन्हाचा तडाखा : ताप, सर्दी, खोकल्याचे आजार वाढले, आबालवृध्द हैराणइंदल चव्हाण अमरावतीवातावरणात अचानक होत असलेल्या बदलांमुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालय, दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या जीवसृष्टीला वातावरणानुसार जगण्याची सवय पडलेली आहे. त्यात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वातावरणाशी समरस होण्यास काही दिवसांचा अवधी लागतो. दरम्यान व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. मात्र ज्यांची प्रतिकारशक्ती प्रबळ आहे, त्यांना अशा आजारांवर मात करणे शक्य होते. परंतु सर्वांना ते शक्य नसल्यामुळे काहींना आजाराचा सामना करावा लागतो. या वर्षात उन्हाळा फारसा तापलाच नाही. ऊन तापालयला सुरूवात झाली नि ४० डिग्री सेल्सिअसवर तापमान पोहोचले की ढगाळ वातावरण, गारपीटसदृश स्थिती निर्माण होऊन वातावरणात अचानक बदल घडत गेले. त्यामुळे कधी प्रखर ऊन तर कधी गारवा असाच यावर्षीच्या उन्हाळ्याचा अनुभव येत आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून ग्रामीण भागासह शहरातदेखील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.वातावरणातील अचानकपणे होत असलेल्या बदलामुळे दैनंदिन सवयीत बदल होत असल्यामुळे शरीराच्या व्यवस्थापनात बदल होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घशाचा आजार उद्भवतात. तसेच लहान मुलांना वातावरणाशी समरस होण्याची सवय नसते. त्यांना वेगवेगळ्या ऋतुचा अनुभव नसतो. त्यामुळे अचानक झालेल्या बदलामुळे मुले आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण तर शनिवारी सकाळपासून कडक उन्हाचे चटके यामुळे थंड वातावरणातून अचानक तीव्र तापमानाशी समरस होणे अशक्य असते. त्यामुळे आजाराचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात अधिक तापमान राहत असताना थंड पाणी, सरबत, ज्युश, पिण्यात येतात. कुलर, एसीमध्ये राहून शरीराला आवश्यक ते वातावरण निर्माण केले जातात. पण अचानक पाऊस आल्यास वातावरणात गारवा निर्माण होतो. त्यामुळे शरीराला झालेली सवय एकदम बदलणे शक्य नसते. परिणामी आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. वातावरणातील बदलामुळे रोगाची लक्षणेउन्हाळ्याच्या दिवसांत तापमानाशी समरस होण्यासाठी कूलर, एसी, डक्टींग आदी कृत्रिम वातावरण निर्मिती केली जाते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे तापमानात घट होते व शरीराला कूलरची सवय लागल्याने आतील बदलामुळे प्रकृतीवर परिणाम जाणवतो. त्यामुळे वातावरण थंड असल्यास कूलरचा वापर थांबवा. तसेच तापमान वाढल्यास एसी, कूलरची हवा घेत असताना तत्कार बाहेर पडू नये.झालेल्या बदलामुळे काय काळजी घ्यावी ?उन्हात अधिक काळ बाहेर फिरणे टाळावे, पाणी स्वच्छ असण्याची काळजी घ्या, पाणी उकळून थंड करुन प्यावे, हात वारंवार धुवा, डासांपासून बचाव करा, स्वच्छता पाळा, सर्दी व खोकल्याच्या रुग्णांनी रुमाल बांधावा. उन्हातून आल्याबरोबर थंड पदार्थ सेवन करू नका. बाहेरून आल्यावर अचानक कूलर, एसीची हवा घेण्याचे टाळावे. बर्फ गोळा खाण्यापूर्वी त्याची शहानिशा करा. त्यावर टाकण्यात येणारे पदार्थयुक्त कलर कसे बनतात, त्यात साकरीनचे प्रमाण किती असतात याची माहिती घ्या. पण शक्यतोवर असे पदार्थ खाण्याचे टाळणेच योग्य राहील.डॉक्टर काय म्हणतात ?१उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटतात. त्यामुळे दूषित पाण्याचे प्रमाण वाढू शकते. जमिनीतील पाणी काही प्रमाणात दूषित होते. या पाण्यामुळे डायरियासारखे आजारांचे प्रमाण वाढते. वर्षातील तीनही ऋतूंत वेगवेगळ्या वातावरणाशी सजीव समरस होतो. सवयीनुसार ते शक्य होते. मात्र अचानक बदलाचा विपरीत परिणाम होऊन आरोग्य धोक्यात येते.-डॉ. वसंत लुंगे, प्राध्यापक, डॉ.पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज.२वातावरणात बदल झाल्याने ताप आजारांचे रुग्ण वाढले आहे. अकाली पावसामुळे तापमान कमी झाले. मात्र पुन्हा कडाक्याचे ऊन तापायला सुरूवात झाल्याने शरीर संतुलन बिघडून आजाराला तोंड द्यावे लागत आहे. अशा पावसात भिजल्यास सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. तसेच उन्हात अधिक वेळ फिरल्यास शरीराला थकवा जाणवतो. -अशोक वणकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.३या दिवसामध्ये लहान मुलांना संसर्गजन्य आजार बळावतात. ताप व डायरिया सारखे आजार वाढतात. लहान मुलांना या दिवसांमध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी, उलट्या, हगवण यासारखे आजार बळावतात. त्यामुळे डासांपासून बचाव करणे व दूषित पाण्यापासून सावध राहण्याची गरज आहे. -स्वप्निल सोनोने, जनरल फिजिशिएशन.४मानवी शरीरात मिठाचे प्रमाण असते. ते वातावरणानुसार कमी-अधिक होतात. ऋतू बदलामुळे शरीराचे संतुलन बिघडते. त्यात ज्यांची प्रतिकारशक्ती सशक्त आहे तो या वातावरणाशी समरस होतो. मात्र ज्याला ते शक्य नसते असे लोक आजारी पडतात. त्यात मुले अधिक प्रमाणात आजारी पडतात. -उज्ज्वल बारंगे, जनरल फिजिशिएशन.