शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

ज्वारीची मातीमोल भावात खरेदी

By admin | Updated: October 18, 2015 00:33 IST

मळणी झालेले ज्वारीचे पीक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणले आहे. मात्र, राज्य शासनाने अद्यापही हमीभावाचे परिपत्रक न काढल्याने ...

शेतकऱ्यांची लूट : हमीभावापेक्षा ४०० रूपये कमी दर नरेंद्र जावरे परतवाडामळणी झालेले ज्वारीचे पीक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणले आहे. मात्र, राज्य शासनाने अद्यापही हमीभावाचे परिपत्रक न काढल्याने व्यापारी प्रतिक्विंटल चारशे रूपये कमी दराने ज्वारीची खरेदी करीत आहेत. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार ज्वारीचा हमीभाव १५७० रूपये प्रतिक्विंटल ठरला. मात्र. व्यापारी ११५० रूपयांप्रमाणेच ज्वारीची खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासकीय दर जाहीर करण्याची मागणी अचलपूर बाजार समितीचे उपसभापती कुलदीप काळपांडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. सोयाबीनचे उत्पन्न अत्यल्प झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ज्वारीच्या उत्पादनावर त्यांना थोड्याफार अपेक्षा होत्या. मात्र, शासनाच्या निर्धारित दरांपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी ज्वारीची खरेदी सुरू केली आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्चही न निघाल्याने कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे ज्वारी विकून दिवाळी व दसरा साजरा करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांची खुलेआम लूट होत आहे. ४०० रूपये कमी दराने खरेदी जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये सोयाबीननंतर लेगच ज्वारीची खरेदी सुरू झाली आहे. परंतु घरी न आणता ज्वारीचे पीक परस्परच बाजारात विक्रीसाठी नेण्याची वेळ बळीराजावर आली आहे. शासनाचे नवीन परिपत्रक येईपर्यंत जुन्याच हमीभावाने खरेदी करणे गरजेचे आहे. मात्र, व्यापाऱ्यांद्वारे ठरविण्यात आलेला दर शेतकऱ्यांची लूट करणारा ठरला आहे. जिल्ह्यातील पहिली मागणी अचलपुरातून ज्वारीला हमीभाव देण्याची पहिली मागणी जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांपैकी अचलपूर बाजार समितीकडून नोंदविण्यात आली आहे. बाजार समितीचे उपसभापती कुलदीप काळपांडे यांनी पणन् व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना एक निवेदन दिले आहे. जिल्हा पणन् व्यवस्थापकांनासुध्दा तसे पत्र देऊन ज्वारीचा हमीभाव तत्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. साडेतीन हजार क्विंटलची आवकअचलपूर बाजार समितीमध्ये १ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबरपर्यंत जवळपास ३५०० क्विंटल ज्वारी खरेदी केल्याची नोंद आहे. त्याचा दर सरासरी ११५० रूपये इतका होता. हा दर शासकीय दरापेक्षा ४०० रूपयांनी कमी असल्याने गोरगरीब शेतकऱ्यांचे अंदाजे १५ लक्ष रूपयांचे नुकसान झाले आहे. बाजार समितीमध्ये मागील महिनाभरात सोयाबीन १ लाख ११ हजार क्विंटल खरेदी केली गेली. त्याचा सरासरी दर ३४७५ रूपये इतका होता. गहू ११ हजार क्विंटल १५८० रूपये, हरभरा १४०० क्विंटल ४२५० रूपयांप्रमाणे खरेदी करण्यात आली. सातबारावर नोंदी शेतकऱ्यांची ज्वारी व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. हीच ज्वारी शासकीय खरेदी करताना जादा दराने याच शेतकऱ्यांच्या नावाने दाखविली जाते. ही प्रथा येथे सुरू आहे. चालू वर्षाच्या सातबारावर ज्वारी पिकाची नोंद घेऊन त्याला लाभ मिळविता येईल. आॅनलाईन किंवा हस्तलिखित सातबारा देण्याची मागणी राहुल कडू यांनी केली आहे.