सुरेश सवळे - चांदूरबाजारअचलपूर विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात असला तरी भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ ताब्यात घेण्याची तयारी चालविली आहे. भाजपच्या पक्ष निरीक्षकांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच घेतल्या. त्यांनी अचलपूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन या मतदारसंघाला ‘प्राधान्य’ देण्याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. त्यामुळे सेना-भाजपत ‘कलगीतुरा’सुरु झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेकडून मोर्शी मतदारसंघ भाजपाला देण्यात आला तर अचलपूर भाजपाने सेनेच्या सुपूर्द केला. यावेळीही या दोनच मतदारसंघासाठी चुरस सुरू आहे. युती-आघाडी होण्याआधीच या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप-सेना या चारही प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी अचलपूर विधानसभा मतदारसंघ लढविण्याची तयारी चालविली आहे. सेनेकडे असलेल्या या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. घेतात याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस आणि युतीची सत्ता असतानाही अचलपूर मतदारसंघाला विशेषत: चांदूरबाजार तालुक्याला मंत्रीपद व पालकमंत्रीपद लाभले. मात्र, अद्याप हे दोन्ही प्रकल्प प्रत्यक्षात निर्माण झालेले नाहीत. गटातटाच्या राजकारणासाठी हा मतदारसंघ प्रसिध्द आहे. त्याच पक्षाच्या उमेदवाराचा त्याच पक्षाचे कार्यकर्ते पराभव करू शकतात, हे अनेकदा या मतदारसंघाने अनुभवले आहे. त्यामुळेच या मतदारसंघात गेल्या १० वर्षांत पक्षीय राजकारणाला तडा गेल्याचे दिसते. भाजपने हा मतदारसंघ परत घेण्यासाठी सर्वंकष हालचाली सुरू केल्या आहेत. तर सेनेनेही हा मतदारसंघ सहजासहजी हातचा जाऊ नये म्हणून ‘फिल्डींग’ लावली आहे. अचलपूर मतदारसंघावरून युतीत बरेच राजकारण शिजण्याची शक्यता आहे.
‘अचलपूर’साठी भाजपच्या हालचाली सुरू
By admin | Updated: August 9, 2014 23:28 IST