शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

बेलोरा विमानतळाचा वीज, पाण्याचा प्रश्न सुटला

By admin | Updated: November 13, 2015 00:21 IST

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचा वीज, पाण्याचा प्रश्न सुटला असून त्याकरिता राज्य शासनाने १३ कोटी रूपये मंजूर केले आहेत.

अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचा वीज, पाण्याचा प्रश्न सुटला असून त्याकरिता राज्य शासनाने १३ कोटी रूपये मंजूर केले आहेत. बेलोरा विमानतळाच्या परिसरात असलेली उच्चदाबाची वीजवाहिनी या निधीतून स्थलांतरित केली जाणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला असून विमानतळाच्या विकासाचे हे पहिले पाऊल मानले जात आहे.राज्य शासनाच्या धोरणानुसार विभागीय केंद्र असलेल्या ठिकाणी विमानतळ अनिवार्य आहे. त्यानुसार राज्याच्या सर्वच विभागीय स्तरावर विमानतळांची निर्मिती करून नियमित विमानसेवा सुरू आहे. मात्र, अमरावती विभागात फक्त अमरावतीत विमानतळ असले तरी येथे नियमित विमानसेवा सुरु नाही. त्यामुळे ही बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढ्यात ठेवली. जानेवारी २०१५ मध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बेलोरा विमानतळाच्या विकासासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. बैठकीला राज्य शासनाच्या विमानपतन विभागाचे सचिव मीना, आ. सुनील देशमुख, आ.रवी राणा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे जनरल मॅनेजर सी.एस.गुप्ता, सहायक महाप्रबंधक गुरावाला आदी उपस्थित होते. १३ कोटी मंजूर : यवतमाळ- अकोला वळणरस्ता निर्मितीचा गुंता कायमबेलोरा विमानतळाचा विकास, विस्तार करण्यासाठी विकास आरखडा तयार करण्यात आला आहे. जागेचा प्रश्न यापूर्वीच सोडविण्यात आला आहे. त्यामुळे येथून विमानसेवा कशी सुरू करता येईल, यावर सर्वाधिक भर दिला आहे. या महिन्यात विमानतळाच्या समस्येबाबत महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे.- प्रवीण पोटे, पालकमंत्री, अमरावती.विमानतळावरून विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे. एकदा विमानसेवा सुरु झाली की अनेक प्रश्न मार्गी लागतात. जानेवारीमध्ये विमानसेवा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने बैठक बोलावली आहे. विमान कंपन्यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे.- एम.पी.पाठक,प्रबंधक, बेलोरा विमानतळ.लहान विमाने सुरू करण्याचा प्रस्तावबेलोरा विमानतळावरुन चार ते नऊआसनी विमाने सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. तासाभराच्या प्रवासासाठी अडीच हजार रुपये तिकिट दर आकारले जाणार आहे. नागपूर, चंद्रपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे विमानसेवा सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. लहान आसनी विमाने सुरु करणे तोट्याचे आहे. मात्र, हा तोटा भरुन काढण्यासाठी वाणिज्य विमान प्रवास तिकिटावर दोन टक्के अतिरिक्त कर आकारला जाईल. दोन टक्के करातून येणारी रक्कम ही लहान आसनी विमानसेवा कंपनीला दिली जाईल. हे धोरण जानेवारी २०१६ मध्ये शासन ठरविणार असल्याची माहिती आहे.