शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

सख्खा भाऊच बनला वैरी

By admin | Updated: September 13, 2014 23:31 IST

वडिलांच्या जागेवर कृषी विभागात नोकरीला लागलेला भाऊ आपल्या कुटुंबासाठी पैसे न देता दारुच्या व्यसनात खर्च करीत असल्याने लहान भावाने मोठ्या भावाची हत्या करुन मृतदेह नालीत फेकून दिला.

कृष्णार्पण कॉलनीतील घटना : आर्थिक अडचण, व्यसनातून हत्या अमरावती : वडिलांच्या जागेवर कृषी विभागात नोकरीला लागलेला भाऊ आपल्या कुटुंबासाठी पैसे न देता दारुच्या व्यसनात खर्च करीत असल्याने लहान भावाने मोठ्या भावाची हत्या करुन मृतदेह नालीत फेकून दिला. ही घटना स्थानिक कृष्णार्पण कॉलनीत शनिवारी सकाळी उघडकीस आली.किशोर नारायण श्रीपदवार (४१), असे मृताचे तर गजानन नारायण श्रीपदवार (३२), असे आरोपीचे नाव आहे. रविकिरण कॉलनीत हे कुटुंब भाड्याने राहते. या कुटुंबात दोन भावांसह लहान भाऊ राजूसह आई प्रमिला देखिल राहते. किशोर हा अनुकंपावर कृषी विभागात मजूर श्रेणी २ चा कर्मचारी होता. गजानन हा रंगकाम करतो. तर लहान भाऊ राजू हा वाहने खरेदी-विक्रीचा धंदा करतो. सफाई कर्मचाऱ्याला दिसला मृतदेहकिशोर हा नोकरीवर असल्याने जास्त पैसे कमवित होता. मात्र घरी पैसे देण्याऐवजी तो दारुत पैशाची उधळपट्टी करीत होता. ही बाब गजाननला सतत खटकत होती. त्याच्या आईलाही निवृत्ती वेतन मिळते. काही दिवसांपूर्वी आई देवरणकरनगर येथे बहिणीकडे गेली होती. त्यामुळे ११ सप्टेंबर रोजी किशोर व गजानन हे दोघे भाऊ बहिणीकडे गेले. तेथे आईकडून निवृत्ती वेतनाची रक्कम घेतली. त्याच रात्री गजाननने मोठा भाऊ किशोरला यथेच्छ दारु पाजली. यातून त्यांच्यात वाद झाला आणि त्याचवेळी घरातून क्रिकेटचा स्टंप आणून किशोरच्या डोक्यावर प्रहार केला. यात त्याचा मृत्यू झाला. एवढ्यावरच न थांबता गजाननने किशोरचा मृतदेह एका पोत्यात भरुन दुचाकी वाहनाने रात्रीलाच कृष्णार्पण कॉलनीतील नालीत फेकून दिला. ही घटना दोन दिवसांनंतर नाली सफाईसाठी आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. ही माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीचा शोध लावण्यात यश मिळविले. आरोपी गजानन श्रीपदवार याला हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली.दारुच्या नशेत सतत होत होता वादकिशोर श्रीपदवार हा दारुच्या आहारी गेलेला होता. घरात पैसे न देता तो दारुत पैसे उडवीत असल्याने घरात सतत भावांमध्ये खटके उडत होते. वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर मिळालेल्या नोकरीचा आपल्याला कोणताही लाभ होत नसताना केवळ मोठा भाऊच मलिदा खात असल्याचे गजाननला सतत खटकत होते. यातूनच वाद होत होता. या वादाचे पर्यावसान अखेर भावाला संपविण्यात झाले.तासाभरात लावला छडाशनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास कृष्णार्पण कॉलनीत सफाई कर्मचारी नालीची साफसफाई करीत होते. येथील रहिवासी शरद देशपांडे यांच्या घरामागील नालीमध्ये कर्मचाऱ्यांना मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच सहायक पोलीस उपनिरीक्ष राठोड हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व मृतदेह शवविच्छेदनाकरिता इर्विन रुग्णालयात पाठविला. राजापेठच्या डीबी स्कॉडने मृताच्या घराची पाहणी केली. गजाननच्या दुचाकीवर रक्ताचे डाग आढळून आले प्रकरणाचा उलगडा झाला.