गरोदर, स्तनदा मातांसाठी योजना : अवघ्या २५ रुपयांत जेवण देण्याचा घाट अमरावती : अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्र्यिा व स्तनदा माता यांना एक वेळ चौरस आहार देण्याच्या योजनेच्या प्रारंभालाच नाट लागण्याची शक्यता आहे. २५ रुपये थाळी न परवडणारी असल्याने ती ५० रुपये करावी व योजनेत नेमण्यात येणाऱ्यांना अंगणवाडी सेविकांचे असहकार्य राहणार आहे. आदिवासी क्षेत्रातील महिलांना गरोदरपणाच्या काळात व बाळंपणानंतरचा सकस आहार मिळत नाही. त्यामुळे अशा भागात कुपोषण वाढते. अर्भक, बालमृत्यू व माता मृत्यूदेखील होतात. ही बाब लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाद्वारा भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरु करण्यात आली. राज्यातील १६ जिल्ह्यातील ८५ अंगणवाडी प्रकल्पाअंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मेळघाटचा यामध्ये समावेश आहे. अंगणवाडी सेविकांतर्गत शासन ही योजना राबविणार आहे. परंतु सकस आहाराच्या जेवणाची थाळी अवघी २५ रुपये आणि मानधन केवळ २५० रुपये असल्यामुळे ही योजना राबविण्याबाबत अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या योजनेसाठी अंगणवाडी केंद्रांतर्गत त्या-त्या गावात समित्यांची स्थापना करण्यात आली. त्या समितीत महिला सरपंच आदिवासी असल्यास किंवा नसल्यास आदिवासी महिला ग्रामपंचायत सदस्य ही समितीची अध्यक्ष असेल व एक स्तनदा माता व एक गरोदर महिला या समितीमध्ये सदस्य राहणार आहे. सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहणार आहेत. या समितीचे बॅँक खाते देखील उघडण्यात आले आहे. लाभार्थीच्या संख्यानुसार थेट बॅँक खात्यात पैसे जमा होणार आहे. या योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपयोजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. लाभार्थींना केळी, अंडी किंवा दूध पुरविण्यात येणार आहे. या योजनेतील अहाराची थाळी २५ रुपयांत कशी मिळणार व देणार कोण? यासंदर्भात नाराजी आहे. याशिवाय ही योजना राबविण्याची संपूर्ण जबाबदारी असलेल्या अंगणवाडी सेविकेला अवघे २५० रुपये मानधन रुपये मिळणार आहे. कागदोपत्री हिशोब सांभाळणे, अहाराची उपलब्धता करणे आणि याशिवाय दैनंदिन अंगणवाडीचे कामकाज सांभाळणे, अशी कसरत अंगणवाडी सेविकाची राहणार आहे. किमान ५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मानधन मिळावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)कुपोषण कमी करण्यास फलदायी दुर्गम भागातील गरोदर महिला व स्तनदा माता यांच्यासाठी वरदान ठरणार आहे. गोदरपणाच्या काळात दुर्गम भागातील महिला सकस आहार मिळत नाही. त्यामुळे जन्माला येणारे बाळ हे कमी वजनाचे असते किंवा बांळतपणातही आहाराचे स्वरुप जेमतेमच राहत असल्यामुळे कुपोषण, अर्भक मृत्यू, बालमृत्यू आणि कधीकधी मातामृत्यूदेखील होतात. याचा टक्का कमी करण्यासाठी अमृत आहार फलदायी ठरणार आहे. आहारात काय राहणार ?सोमवार ते शनिवारदरम्यान दररोज एकवेळ देण्यात येणारा आहार कसा असावा, याची मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात आली आहेत. त्या व्यतिरिक्त पदार्थाचा समावेश राहिल्यास लागलीच जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार करता येते. आहारात दररोज चपाती किंवा भाकर, भात, दाळ, हिरवी पालेभाजी, अंडी किंवा पर्यायी अन्न घटक अर्धा केळी किंवा नाचणीचा हलवा आणि शेंगदाणा लाडूचा समावेश आहे. शनिवारच्या मेनूत शेंगदाणा लाडूऐवजी सोया दूधचा समावेश अहे. एकवेळच्या आहारात ९०० किलो कॅलरी २९.५४ ग्रॅम प्रथीने, ३३४८ ग्रॅम मेद, ९१.३५ मि.ग्रॅ. कॅलिश्यम, ६०५७७ मि.ग्रॅँ लोह राहील, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
‘अमृत आहार’च्या प्रारंभाला अडसर
By admin | Updated: February 12, 2016 01:02 IST