अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील दोन्ही डॅम पावसाच्या पाण्याने फुल्ल झाले आहेत. या डॅमच्या पाण्यामुळे विद्यापीठ परिसरासह आजुबाजूच्या परिसरातही वर्षभर पाणी मिळत असल्यामुळे सर्व परिसरात हिरवळीचे वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे वृक्ष सवंर्धनाला चांगलीच मदत मिळत आहे. अमरावती विद्यापीठ परिसरात वनसंपदा विविध प्रजातीच्या वृक्षांनी बहरले आहे. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वृक्षांमुळे वर्षभर परिसरात प्रफुल्लीत वातावरण पहायला मिळते. त्यामुळे विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्यदायक वातावरण मिळते आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे सर्वांनाच वर्षभर शुध्द हवा मिळत आहे. त्यामुळे येथे दररोज मार्निग वॉकचा आनंद नागरिक घेताना दिसून येतात. दिवसभर विविध पक्ष्यांचा किलबिलाट परिसरात कानी पडतोे. विद्यापीठ परिसराच्या मागील बाजुला दोन मोठे धरण आहे. तसेच ६ छोटे बंधारे आहेत. सद्यस्थितीत डॅम व बंधारे पावसाच्या पाण्याचे फुफ्फ झाले आहेत. विद्यापीठाचा परिसर ४७० एकरामध्ये विस्तारला आहे. विविध प्रजातीच्या हजारो वृक्षांचे संगोपन विद्यापीठ प्रशासन करीत आहे. विविध वृक्षांसोबतच औषधोपयोगी वृक्षांचीही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील वनसंपदेला वर्षभर पाणी मिळत आहे. वनसंपदेचे संगोपन करण्याकरिता कुलगुरु मोहन खेडकर यांचा मोलाचा वाटा आहे.
अमरावती विद्यापीठाचे ‘डॅम फुल्ल’
By admin | Updated: September 9, 2014 23:09 IST