वरुड : परिसरात मध्यप्रदेशातून रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणार्या एका टिप्परवर तहसीलदारांनी कारवाई करुन ४0 हजार ११४ रुपये दंड ठोठावला. दरम्यान चालकाने कार्यालयाच्या आवारातच आत्महत्येची धमकी दिल्याने खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता वरुडपरिसरातून रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारा टिप्पर क्र. एम.एच.४0 वाय-७९९५ तहसीलदार राम लंके यांनी जप्त केला. या ट्रकमधून ४३ टन रेतीची वाहतूक होत होती. संबंधित रेती वाहतूकदारा विरुध्द ४0 हजार ११४ रुपयांचा दंडमहसूल विभागाने आकारला. ही कारवाई सुरू असतानाच टिप्पर मालकाने चालकाला चक्क तहसीलदार राम यांच्यासमोर कार्यालयाच्या आवारातच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यामुळे प्रशासनावर वाळूमाफिया दबाबतंत्राचा वापर करीत असल्याची चर्चा होती. याबाबत तहसीलदारांनी कारवाई करुन परिवहन विभागाला कारवाईकरिता पत्र दिल्याचे सांगण्यात येते. मात्र रेती तस्करांच्या अरेरावीमुळे अधिकारी व कर्मचार्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची चर्चा आहे. अवैध रेती वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी महसूल विभागाने पाऊल उचलल्यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आरटीओ चेकपोस्टचे स्थानांतरण भोवणार■ तहसील कायालयालगत आरटीओ वाहन तपासणी नाका दोन दशकांपासून होता. यामुळे ओव्हरलोड वाहतुकीला आळा बसला होता. परंतु आता हा वाहन तपासणी नाका गत महिन्यापासून रवाळा येथे स्थलांतरित झाल्याने अवैध वाहतुकदारांना रान मोकळे झाले. प्रशासनाला न जुमानता रेतीचीवाहतूक केली जाते. याला आळा घालण्याकरिता तहसीलदार राम लंके यांनी वक्र दृष्टी फिरविल्याने रेतीवाहतूक करणार्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. परंतु दिवसेंदिवस रेती तस्करांची मनमानी वाढतच चालली आहे.
रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई
By admin | Updated: May 9, 2014 01:40 IST