पुण्यतिथी महोत्सव : संत शंकर महाराज यांचे प्रबोधनअमरावती : अच्युतावाणी ज्ञानमणी...झाला नाही कुणी तशीच भक्ती सिद्धेला गेली, असे बोधवचन संत शंकर महाराज यांनी केले. सोमवारी १५ सप्टेंबर रोजी तिवसा तालुक्यातील शेंदूरजना (बाजार) येथे संत अच्युत महाराज संस्थानद्वारा आयोजित महाराजांच्या द्वितीय पुण्यतिथी सोहळ्यात ते प्रबोधन करीत होते. शंकर महाराज पुढे म्हणाले की, संत अच्युत महाराज विदर्भाचे ज्ञानेश्वर होते. त्यांच्यासारखा ज्ञानमणी आजवर जन्मला नाही. यावेळी मंचावर हभप कन्हेरकर महाराज, ग्रामगीताचार्य रामकृष्ण बेलूरकर, संस्थानचे अध्यक्ष अनिल सावरकर आदी उपस्थित होते. सुरूवातीला महासमाधीचे पूजन करण्यात आले. सुधीर दिवे, रघुनाथ कर्डीकर, पासेबंद, तिवसा पंचायत समिती सभापती देवीदास डेहणकर, श्याम गडकरी, अनंत धर्माळे, उषाताई ठुसे, भोजराज देवते, अशोक देवते, मनोहरराव निमकर, नारायणराव बोडखे उपस्थित होते. मौन भावांजली संत अच्युत महाराज यांच्या द्वितीय पुण्यतिथी सोहळ्याला विदर्भातून हजारो भाविक उपस्थित होते. सोमवारी सकाळी भाविकांनी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण केली.
अच्युतवाणी ज्ञानमणी.. झाला नाही कुणी
By admin | Updated: September 16, 2014 01:02 IST