संजय खासबागे - वरुडराज्यात १५ आॅगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरु करण्यात आली होती. सन २०१२-१३ या वर्षातील गावांचे नुकतेच मूल्यमापन झाले. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांतून ९६ गावे तंटामुक्ती पुरस्काराकरिता पात्र ठरली असून एकही गाव विशेष पुरस्काराकरिता पात्र ठरले नाही, हे विशेष. तंटामुक्तीच्या पुरस्कारासाठी तिवसा तालुक्यातील केवळ एक गाव तर धारणी तालुक्यातील २० गावांचा यात समावेश आहे. ९६ गावांकरिता जिल्ह्याला दोन कोटी ४९ लाख रुपये पुरस्कार स्वरुपात मिळणार आहेत.२०१२-१३ चा तंटामुक्तीचा पुरस्कार मिळविणाऱ्या गावांमध्ये दर्यापूर तालुक्यातील कळाशी, आमला, लेहेगाव, वडुरा, मोचर्डा, बेंबळा(बु),उमरीबाजार या सात गावांचा समावेश आहे. अंजनगांव (सुर्जी) तालुक्यातील भंडारज, टाकरखेडा मोरे, धनेगाव, दहिगाव रेचा, पांढरी खानमपूर, साखरी, शेंडगाव, कोकर्डा, लाखनवाडी, सातेगाव अशा दहा गावांचा समावेश आहे. अचलपूर तालुक्यातील बोपापूर, काकडा, चमक (बु), हनवतखेडा, एकलासूर, वडगाव फत्तेपूर, वझ्झर या सात गावांचा समावेश आहे. चांदूरबाजार तालुक्यातील खरपी, लाखनवाडी, रतनपूर, सर्फापूर या चार गावांचा समावेश आहे. मोर्शी तालुक्यातील खानापूर, विष्णोरा, धामणगाव, शिरखेड या चार गावांचा समावेश आहे. वरुड तालुक्यातील ईसापूर, बाभुळखेडा आमनेर, घोराड, शिंगोरी, जामगाव, पेठ मांगरुळी या सात गावांचा समावेश आहे. तिवसा तालुक्यातील चेनुष्टा या एकाच गावाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील सानोरा (खुर्द), टेंभुर्णी, शिरजगाव, नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यातील धानोरा मोगल अशा चार गावांचा समावेश आहे. धामणगाव (रेल्वे) तालुक्यातील वाघोली, गव्हाफरकाडे, गुंजी, बोरगाव (नि) कावलीे, पिंपळखुटा, भातकुली, दाभाडा, हिरपूर अशा नऊ गावांचा समावेश आहे. नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यातील कोदोरी मारुख, कझंरा, लोहगांव, पुसनेर, पहूर, सावनेर, बडनेरा, पाळा अशा एकूण सात गावांचा समावेश आहे. चिखलदरा तालुक्यातील शहापूर, आमझरी, कोहाना, तेलखार, मोरगड, कुलंगणा (खु), वामादही, दहेंद्री कोरडा या नऊ गावांचा समावेश आहे. धारणी तालुक्यातील चाकर्दा, काकरमल, झिल्पी, साद्रावाडी, राजपूर, डाबका, सालीखेडा, दादरा, हिराबंबई, राणीगाव, गोलाई, विरोटी, चेंडो खाऱ्या टेम्पू, टिंगऱ्या, गोंडवाडी, हरिसाल, जांबू, नांदुरी, धूळघाट रेल्वे या एकूण २० गावांचा समावेश आहे. भातकुली तालुक्यातील आसरा, सायत वाठोडा (शु), वायगाव, टाकरखेडा (संभू), या ५ गावांचा समावेश आहे. अमरावती तालुक्यातील नया अकोला, नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांंतर्गत कठोरा गांधी या दोन गावांचा समावेश आहे. तंटामुक्ती पुरस्कारासाठी निवड झालेली सर्वाधिक २० गावे धारणी तालुक्यातील असून सर्वात कमी म्हणजे केवळ एक गाव तिवसा तालुक्यातील आहे.
९६ गावांची तंटामुक्ती पुरस्कारासाठी निवड
By admin | Updated: September 8, 2014 23:29 IST