शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भूविकास बँकेचे २.७५ कोटी बुडाल्यात जमा!

By admin | Updated: November 27, 2015 00:14 IST

जिल्हा भूविकास बँकेच्या प्रदीर्घ सेवेतून ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमचे बेदखल करण्यात आले.

वसुलीसाठी कंत्राटी कर्मचारी : परतफेड योजनेची यशस्विता धोक्यातअमरावती : जिल्हा भूविकास बँकेच्या प्रदीर्घ सेवेतून ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमचे बेदखल करण्यात आले. त्यांना सेवामुक्तीच्या नोटीस दिल्याने बँकेला ‘येणे’ असलेली २.७५ कोटी रुपयांच्या थकीत कर्ज वसुलीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विद्यमान कर्मचाऱ्यांना ‘बँकेवरील बोझा’ वाढू नये म्हणून सक्तीची स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडल्या गेले. तथापि थकीत कर्जवसुलीसाठी बँकेच्या अवसायक किंवा सहकार खात्याकडे निश्चित अशी योजना नाही. वसुलीसाठी आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल, असा पर्याय समोर आला आहे. तथापि या पर्यायाने थकीत कर्ज वसुली होईलच, याबाबत खुद्द सहकार विभागच साशंक आहे.सन २००७ पासून राज्यातील भूविकास बँकांना घरघर लागली. जिल्हा सहकारी बँका, खासगी वित्तीय संस्थांच्या स्पर्धेपुढे भूविकास बँकांनी शरणागती पत्करली व त्यापासून शेतकरी वर्गाचा या बँकेवरील विश्वासाला तडा गेला. त्याचा परिणाम कर्जवसुलीवर झाला. नवीन कर्जच देणे बंद झाल्याने शेतकऱ्यांनी बँकेकडे पाठ फिरविली. वसुली रखडली. थकीत कर्जासाठी विशेष प्रयत्नही करण्यात आली नाही आणि पर्यायाने बँकेवरील बोझा वाढतच गेला. परिणामी एप्रिल २०१५ मध्ये शिखर बँकेसह राज्यातील २९ भूविकास बँका बंद करण्याचा निर्णय झाला आणि मंगळवारी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना रिक्त हस्ते बँकेच्या सेवेतून काढण्यात आले. त्यांच्यामध्येही असंतोष निर्माण झाला आहे. वसुलीवर नुकसान भरपाईअमरावती : बँक बुडाल्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे २.७५ कोटींची थकीत वसुली कशी होेईल? बँकेचे पूर्णवेळ कर्मचारी-अधिकारीच जी वसुली ७-८ वर्षांपासून करू शकले नाहीत ती वसुली आता ‘वातानुकूलित केबीन’मध्ये बसलेले अधिकारी कशी काय करू शकतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वसुलीसाठी गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शेतकरी दारावर उभा करणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. ज्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना बँकेच्या सेवेतून कायमचे मुक्त करण्यात आले, त्यांचे थकीत वेतन, ग्रॅज्युइटी आणि स्वेच्छानिवृत्तीची नुकसान भरपाई थकीत कर्ज वसुलीतून द्यावी, असे सहकार विभागाचे निर्देश आहेत. अमरावती भूविकास बँकेचा शेतकऱ्यांकडे सुमारे २ कोटी ७५ लाख रूपयांची थकीत कर्जवसुली आहे. तथापि या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी सुमारे १५ कोटी रूपये एकत्रित नुकसान भरपाई द्यायची आहे. बँक अवसायनात गेल्यावर कर्जवसुली शक्य होणार नाही आणि बँकेची मालमत्ता विक्रीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. त्यामुळे कर्जवसुली होणार नाही आणि बँकेची मालमत्ता विकली जाणार नाही, अशा परिस्थितीत नुकसान भरपाईची रक्कम केव्हा मिळेल, या विवंचनेत हे कर्मचारी अडकले आहेत.