शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

१४३ उमेदवार अपात्र

By admin | Updated: May 9, 2015 00:32 IST

जिल्ह्यात सन २०१२-१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच सन २०१४-१५ मध्ये झालेल्या चांदूररेल्वे,

सन २०१२, २०१४ ची जि.प.-पं.स. निवडणूक : खर्च सादर न केल्याने कारवाईगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात सन २०१२-१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच सन २०१४-१५ मध्ये झालेल्या चांदूररेल्वे, धामणगाव व तिवसा या तालुक्यांमधील पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या परंतु विहित मुदतीमध्ये निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या १४३ उमेदवारांवर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई केली आहे. ही कारवाई झालेल्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचे विद्यमान सदस्य नसले तरी ही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा समावेश आहे. सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढविणारे ३१, यावर्षी पंचायत समितीची निवडणूक लढविणारे १०२ उमेदवार तसेच सन २०१४ मधील पंचायत समिती निवडणूक लढविणारे १० उमेदवार अशा एकूण १४३ उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ६२ ए (१) अन्वये पाच वर्षांसाठी ही अपात्रतेची कारवाई करण्यात आली. निवडणुकीचा खर्च विहित मुदतीत सादर करणे शासनाने बंधनकारक केले आहे. परंतु निवडणूक आटोपल्यानंतर निवडणूक लढविणारे व निवडून येणारे उमेदवार ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. परिणामी निवडणूक खर्च विहीत मुदतीत सादर न केल्याने शासनाकडून कठोर कारवाईचे हत्यार उपसण्यात आले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. जि.प.च्या ३१ उमेदवारांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदीपाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी आलेल्यांमध्ये मंगरुळ दस्तगीर गटाच्या प्रतिभा घरत, उमा मडावी, देवगाव गटाचे संदीप उईके, रणजीत कोयताडे, सुरेश रंधळे, तळेगाव दशासर गटाच योगेश्वर कवाडे, श्रध्दानंद रामगावकर, हिवरखेड गटाच्या अश्विनी कानफाडे, शिवानी राऊ त, लता साऊ त, माधुरी अजमिरे, राजुरवाडी गटाच्या कल्पना भलावी, विद्या तलांजे, नेरपिंगळाई गटाच्या पद्मा डहाके, रेखा मडके, अंबाडा गटाच्या प्रिती सांकाम, उर्मिला धुर्वे, खल्लार गटाच्या मिनी चव्हाण, येवदा गटाचे मनिराम पवार, पिंपळोद गटाच्या रेखा गावंडे, साऊ र गटाच्या सारिका दाभाडे, वाठोडा शुक्लेश्वर गटाच्या सविता चव्हाण यांचा समावेश आहे. जि.प.,पं.स. अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कारवाईजिल्ह परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला ३ लाख रुपये व पंचायत समिती उमेदवाराला अडीच लाख रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. या उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्याच्या ३० दिवसांच्या आत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. सन २०१४ मधील पं.स. चे १० उमेदवार अपात्रसन २०१४ मध्ये चांदूररेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर गणाचे ममता ठाकूर, पळस गणाचे पंंडित गवई, राजुरा गणाच्या पुष्पा काळे, लता बोडखे, जुना धामणगाव गणाचे प्रशांत भगत, अंजनसिंगी गणाचे सुरेश हुडे, धामणगाव तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर गणाच्या बेबी भोयर,चिंचोली गणाच्या प्रतिभा पवार, तळेगाव गणाच्या भाग्यश्री रामगावकर, शेंदुरजना खुर्द गणाचे रविश बिरे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.