नवोदय प्रवेश : जिल्ह्यात ४५ परीक्षा केंद्रेअमरावती : जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून एकूण ११ हजार ८७९ विद्यार्थ्यानी ही परीक्षा ४५ केंद्रावर घेण्यात आली.केंद्र शासनाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाचे जवाहर नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यात आहे. इयत्ता सहावीनंतर नवोदय विद्यालयासाठी प्रवेश घेता येतो. दरवर्षी या प्रवेशासाठी जिल्हाभरातून विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाते या परीक्षेतून शहरी आणि ग्रामीण अशा दोन विभागांची गुणवत्ता यादी तयार करून गुणवत्तेनुसार नवोदय प्रवेश दिला जातो. यावर्षी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी जिल्हाभरातून १२ हजार ६८२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यात ५ हजार ९४० मुलापैकी ५ हजार ५२० मुलांनी परीक्षेत सहभाग घेतला तर ४२० मुले परीक्षेला गैरहजर होते. आणि ६ हजार७४२ मुलींन पैकी ६ हजार ३५९ मुलींनी परीक्षा दिली आहे, तर ३८३ मुली परीक्षेत सहभागी झाल्या नव्हत्या. जिल्ह्यातील ४५ केंद्रावर ही परीक्षा पार पडली. ८ जानेवारी रोजी ही परीक्षा घेण्यात आली. जिल्हाभरातील केंद्रावरून ११ हजार ८७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून ८०३ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
१२ हजार परीक्षार्थी
By admin | Updated: January 13, 2017 00:08 IST