शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

टिचभर पोटासाठी.. आयुष्याची बाजी!

By admin | Updated: September 16, 2014 18:19 IST

दारिद्रय़ाच्या खाईत मुलांचे भविष्य गडप

अकोला : उपाशी पोटी आतड्यांना पिळ पडल्यानंतर जेव्हा डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात, तेव्हा कळतं भूक काय असते? तसे तर बालपण खेळण्या-बागडण्याचे वय. या वयात मनसोक्त खेळणे, संकट, समस्यांपासून मुक्त राहून भविष्याची पायाभरणी करणे, हेच अपेक्षित असते. मात्र, शहरातील अनिकट, वाशिम बायपास परिसरातील मुलांच्या नशिबी भलतेच दारिद्रय़ आले आहे. या गरिबीने त्यांच्यापासून त्यांचे सुखच हिरावले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी या मुलांना तासन्तास मेहनत घेऊन वेळप्रसंगी जीव धोक्यात घालावा लागत आहे. एवढे सर्व करूनही त्यांना दिवसाला मिळते काय ते पाच ते दहा रुपये. नुकताच हर्षोल्हासात गणेश उत्सव साजरा झाला. अकोल्यातही लाखो लोकांनी हा उत्सव आनंदाने साजरा करीत नुकतेच गणेश मूतर्ी्ंचे शहरातून वाहणार्‍या मोर्णा नदीत विसर्जन केले. गणेश मूर्तीसोबतच दहा दिवसांचे हार फुलांचे निर्माल्यही विसजिर्त करण्यात आले. या निर्माल्यासोबतच गणेश मूर्तीसमोरील, कलशामध्ये ठेवलेले पैसेही नदीत फेकण्यात येतात आणि मग विसर्जनाच्या दुसर्‍या दिवसापासून सुरू होतो तो या पैशांचा शोध. शहरातील अनिकट, हरिहरपेठ व वाशिम बायपास या नदीकाठच्या भागात दहा ते पंधरा हजार लोकांची वस्ती आहे. कमालीचे दारिद्रय़ या लोकांच्या नशिबी आले आहे. शिक्षणाचे तर नामोनिशाणही नाही. मोलमजुरी करणे, कुटुंबाचे पालनपोषण करणे, हीच दिनचर्या. त्यातही व्यसनांचा भडीमार. या भागातील पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुले-मुली दरवर्षी गणेश विसर्जनानंतर तीन ते चार दिवस नदीमध्ये पैशांचा शोध घेत असतात. शाळा अन् शिक्षण तर माहितीच नाही. ही मुले टेपरेकॉर्डरचा स्पीकरला लोहचुंबक लावतात. या लोहचुंबकाला दोरी बांधायची व ज्या ठिकाणी मूर्ती शिरविण्यात आल्या तेथे उभे राहून लोहचुंबक पाण्यात फेकायचे, ते फिरवायचे व बाहेर काढायचे. त्याला काही पैसे चिटकले का हे पाहायचे. पुन्हा फेकायचे. अशाप्रकारे दिवसभर पाण्यात उभे राहून, थोड्या थोड्या वेळाने जागा बदलून ही मुले पाण्यात पैशांचा शोध घेत असतात. आणि त्यांना मिळतात केवळ पाच ते दहा रुपये. तेही सापडण्याची शक्यता धुसरच. मात्र, तरीही गरिबी, पोटात ओरडणारे कावळेच त्यांच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण करतात आणि जीव धोक्यात घालून ते पैशांचा शोध घेत असतात.