शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

विद्यार्थिनींनी संशोधनातून बनविला ‘वॉटर गॅस’!

By admin | Updated: August 10, 2016 00:42 IST

अकोला येथील इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनात ‘वॉटर गॅस’चा अभिनव प्रकल्प.

नितीन गव्हाळे अकोला, दि. 0९: देशामध्ये विविध विषयांवर संशोधन केल्या जात आहे. सौरउर्जा, वायुउर्जा, पाण्याच्या स्रोतांवर अनेक शास्त्रज्ञ संशोधन करून नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. ऊर्जा ही मानवी जीवनासाठी महत्त्वाची गरज बनली आहे. ही गरज लक्षात घेता, बोरगाव मंजू येथील परशुराम नाईक विद्यालयातील आठवीत शिकणार्‍या विद्यार्थिनींनी संशोधनातून ह्यवॉटर गॅसह्ण निर्मितीचा प्रकल्प तयार केला आहे. स्वावलंबी विद्यालयातील सुरू असलेल्या इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनामध्ये या विद्यार्थिनींचा वॉटर गॅसचा प्रकल्प विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांचेही आकर्षण ठरला आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर अनेक वैज्ञानिक संशोधनातून नवनवीन तंत्रज्ञान जगासमोर आणतात. शास्त्रज्ञांच्या माध्यमातून जगाला सौरउर्जा, पवनचक्की, पाणी, कोळसा या माध्यमातून विद्युत ऊर्जा, विविध प्रकारच्या इंधनाचा शोध लागला आणि जगाच्या विकासासाठी आज या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. आपल्याही संशोधनातून नावीन्यपूर्ण प्रकल्प तयार व्हावा आणि या प्रकल्पाचा लौकिक व्हावा, या दृष्टिकोनातून बोरगाव मंजू येथील परशुराम नाईक विद्यालयातील आठव्या वर्गात शिकणार्‍या चंचल इंगळे, रसिका पाचडे या विद्यार्थिनींनी विज्ञान शिक्षक विजय पजई यांच्या मार्गदर्शनात प्रॉडक्शन अँण्ड युटीलिटी ऑफ वॉटर गॅस हा प्रकल्प तयार केला. सद्यस्थितीत विद्युत उर्जेची मागणी प्रचंड आहे. त्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण होतो आणि विजेची तूट भरून काढण्यासाठी भारनियमन केले जाते. यावर वॉटर गॅस हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या विचारातून विद्यार्थिनींनी पाणी आणि कोकच्या सहाय्याने वॉटर गॅसची निर्मिती केली. ह्यवॉटर गॅसह्णची निर्मितीच नाही तर त्याचे प्रात्यक्षिकसुद्धा विद्यार्थिंनींनी इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनात मांडले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या ह्यवॉटर गॅसह्णद्वारे पंखा व दिवे चालू शकतात. हे त्यांनी त्यांच्या संशोधनातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रकल्पाला विद्यार्थी व शिक्षक कुतूहलाने न्याहाळत आहेत. परीक्षकांनीसुद्धा त्यांच्या प्रकल्पाची माहिती जाणून घेत, कौतुक केले आहे. कसा तयार केला ह्यवॉटर गॅसह्णप्रथम पाण्याला उष्णता देऊन पाण्याची वाफ ही तप्त लाल कोकवरून पाठविल्यास कोकमधील कार्बन हा पाण्याचे रिडक्शन करतो व कोक स्वत:चे ऑक्सिडीकरण घडवून आणते. तेव्हा(सी+एच २) यांचे मिश्रण तयार होते. या मिश्रणाला वॉटर गॅस म्हणतात. या गॅसचा आपण इंधन म्हणून वापर करू शकतो. सी+एच २ ओ आणि सी ओ + एच २ वॉटर गॅस इतर वायुरूप इंधनाप्रमाणेच याचासुद्धा वापर करून आपली प्रगती करू शकतो. वॉटर गॅससोबत हवेतील ऑक्सिजनचे चेंबरमध्ये ज्वलन होते तेव्हा कार्बनडाय ऑक्साईड(सी ओ २) व पाण्याची वाफ(एच २ ओ) मिळते. या रासायनिक क्रियेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते. याच उष्ण उर्जेने तयार केलेल्या प्रकल्पातील पिस्टनला कार्यान्वित करून गतिमान करता येते. म्हणजेच यातील उष्ण उर्जेचे रूपांतर यांत्रिक उर्जेमध्ये केले आहे व पिस्टन डायनॅमिला जोडून वीज निर्मिती केली. यावर अनेक प्रकारचे उपकरणे आपण चालवू शकतो.