शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यातील २२ पुरातन तलाव आटले

By admin | Updated: July 8, 2014 21:52 IST

आकोटनजीक सातपुड्यातील डोंगरदर्‍यामध्ये असलेले २२ पुरातन तलाव व इतर पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यप्राण्यांसाठी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

आकोट: आकोटनजीक सातपुड्यातील डोंगरदर्‍यामध्ये असलेले २२ पुरातन तलाव व इतर पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यप्राण्यांसाठी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस पडला नसल्यामुळे नदी-नाले, झरे कोरडे पडले आहेत. बांधलेले पाणवठे लवकर आटत आहेत. जंगलात प्रखर उन्हाळा असल्यागत वातावरण आहे. जनावरांची संख्यापाहता मुबलक पाणी मिळत नसल्याने वन्यप्राणी ग्रामीण वस्तीकडे धाव घेतआहे. ग्रामीण भागातील वस्त्यामध्ये तसेच शेतीवर वन्यप्राणी पोहचत असल्याने मान्सूनपूर्व लागवड केलेली पिकेसुद्धा फस्त केल्या जात आहे. त्यामुळे लवकर पाऊस न पडल्यास सातपुड्यातील प्राण्यांचे अधिवास क्षेत्रात बदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भटकलेल्या वाघासह इतर वन्यप्राण्यांची शिकार होण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.मेळघाट व्याघ्रप्रकल्पांतर्गत आकोट वन्यजीव विभागातील नरनाळा, वान, अंबाबरवा या रेंजमध्ये ६ वाघ, ९ बिबटे, १६ अस्वल, २ नीलगायी, २ सांबर, १५ तडस, १७ रानकोंबड्या, २१ मोर, २२ रानडुक्कर, ५ रानहेले, १0८ लंगुर, ७ कोल्हे, हरिण व इतर विविध ८00 जनावरांचा कमी-जास्त समावेश असल्याची वन विभागात दप्तरी नोंद आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा परिसर प्राण्याकरिता सोईचा समजल्या जातो. या जंगलात विविध प्रकारचे खाद्य वनसंपत्ती असल्याने १५0 पक्ष्यांच्या निरीक्षण नोंदी झाल्या आहेत. स्वर्गीय नर्तक, रानपिंगळा, पोपटसारख्या दुर्लक्षित पक्ष्याची नोंद असून, जमिनीलगत वावरत असणार्‍या झुडपी दुर्लावसह सर्प, गरुड, घार, शिकरा, पिंगळा, मैना, भोरडी, राघू, दयाळ, टिटवा खंड्या, किरकुकू, तुरेवाला वृक्षीय अबाबिल, चातक, रानखाटीक रानरातवा आदी पक्ष्यांचा जंगलातील आकाशात स्वच्छंद संचार असतो. विशेष म्हणजे या भागात दुर्मीळ पक्षी आढळत आहेत.या अभयारण्यात दरवर्षी ५00 ते ९00 मिमी पाऊस पडतो; परंतु अद्यापही पाऊस पडला नसल्याने जंगलात वन्यप्राण्यांनी गाववस्ती तसेच पोपटखेड धरण व वान धरणनदीकडे पाण्याकरिता भटकंती सुरू केली आहे. लवकरच पाऊस न पडल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.