अकोला : आषाढीनिमित्त पंढरपूरला जाणार्या वारकर्यांसाठी रापमच्या अकोला विभागातर्फे दरवर्षी विशेष गाड्या सोडण्यात येतात. मध्यवर्ती बसस्थानकावरून पंढरपूरसाठी सोडण्यात येणार्या विशेष बसगाड्यांना यंदा वारकर्यांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात घट होणार असल्याचे संकेत अधिकार्यांनी दिलेत.राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील सर्व प्रमुख बसस्थानकांवरून आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार्या प्रवासी वारकर्यांसाठी विशेष बस गाड्यांचे नियोजन केले जाते. गेल्या काही वर्षांंंचा अभ्यास करून यंदादेखील पंढरपूरला जाणार्यांची गर्दी कायम राहील, असा निष्कर्ष काढून अकोला विभागाच्यावतीने यंदा १६0 बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गेल्या ३ वर्षांंंच्या तुलनेत यंदा पंढरपूरला जाणार्या वारकर्यांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी अकोला जिल्हय़ात वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याने पेरण्या वेळेवर आटोपल्या होत्या. परिणामी गतवर्षी विठूरायाच्या दर्शनाला जाणार्या ग्रामीण भागातील नागरिकांची अमाप गर्दी होती. वाढत्या गर्दीमुळे एसटी महामंडळालादेखील अतिरिक्त गाड्या उपलब्ध करण्यास कसरत करावी लागली होती. मात्र, यंदा दोन महिने उलटूनही पावसाचा थांगपत्ता नसल्याने विषम परिस्थिती निर्माण झाली आहे.मधल्या काळात एसटीची झालेली भाडेवाढ परवडणारी नसल्याने अनेक प्रवासी मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सोडण्यात येणार्या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसने पंढरपूरला जाणेच पसंत करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षींंं भरपूर उत्पन्न देणार्या एसटी महामंडळाच्या या योजनेस प्रवासी वारकर्यांचा अल्प प्रतिसाद लाभत असल्यामुळे यंदा अकोला विभागाच्या उत्पन्नात घट होणार असल्याचे संकेत एसटीच्या स्थानिक अधिकार्यांनी दिलेत.
एसटीला वारकर्यांचा अल्प प्रतिसाद
By admin | Updated: July 8, 2014 00:20 IST