शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
2
India Pakistan War : 'तुम्ही आमचे पाणी थांबवा, आम्ही तुमचा श्वास बंद करणार'; पाकिस्तानी सैन्याने हाफिज सईदची भाषा बोलायला सुरूवात केली
3
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
4
हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री! ट्रम्प प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
5
अभिनेत्री निकिता दत्ताला कोरोनाची लागण, आईचीही टेस्ट पॉझिटिव्ह; म्हणाली, "आशा आहे की..."
6
कान्समध्ये ऐश्वर्याच्या नवीन लूकची चर्चा! गाउनवर लिहिला भगवद्गीतेचा खास श्लोक, पुन्हा एकदा दाखवली भारतीय संस्कृती
7
Vaishnavi Hagawane Death Case : फरार काळात मटणावर ताव, हगवणे पिता -पुत्राचा फरार काळातील सीसीटीव्ही आला समोर
8
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
9
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
10
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
11
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
12
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
13
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
14
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
15
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
16
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
17
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
18
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
19
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
20
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक

‘एकता’ वन महोत्सवातून सामाजिक सलोखा

By admin | Updated: July 2, 2016 02:15 IST

पोलीस दलाने लावली २0६९ झाडे.

अकोला : हरित महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी राज्य शासनाने राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अनुषंगाने १ जुलै रोजी वन महोत्सवादरम्यान अकोला पोलीस दलाच्यावतीने जिल्हाभरातील पोलीस ठाणी व चौक्यांच्या परिसरात २0६९ झाडे लावण्यात आली. वन महोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून सर्वधर्मीय जनतेच्या सहभागातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हय़ात ज्या ठिकाणी जातीय तणावाच्या घटना वारंवार होतात, तेथे शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र, प्रतिष्ठित नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना ह्यएकता वृक्षारोपण कार्यक्रमासह्ण आमंत्रित करून सर्व धर्मियांमध्ये एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी वृक्षारोपण केले. अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर व बाळापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख यांनी उरळ पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या हातरुण चौकात व बाळापूर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण केले. शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या खैर मोहम्मद प्लॉट पोलीस चौक येथे वृक्षारोपण केले. आकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर. पी. मनवरे यांनी आकोट शहर पोलीस स्टेशन व तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत येणार्‍या पंचगव्हाण पोलीस चौकीत वृक्षारोपण केले. पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) अरविंद पाटील यांनी पोलीस मुख्यालयात व पोलीस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण केले. जिल्हय़ातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यांमध्ये वृक्षारोपण केले. वाहतूक शाखेचे प्रकाश सावकार यांनी वाहतूक शाखेच्या आवारात वृक्षारोपण केले.