शेगाव: आजची युवा पिढी उद्याचे भवितव्य समजले जाते. परंतु आजच्या एकविसाच्या आधुनिक तंत्रज्ञान विश्वास आजच्या युवा पिढीला खर्रा, सिगारेट अत्यंत आवश्यक दैनंदिन मुलभूत गरज बनली असताना तंबाखू या वस्तुंचा खर्च दोन वेळच्या जेवनापेक्षा महाग झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे अन्नापेक्षा व्यसन महाग म्हणण्याची वेळ आली आहे. दिवसातून किमान दोन वेळा जेवण घेतले जाते. मात्र अपायकारक असणारा तंबाखू, खर्रा, सिगारेट आदी पदार्थ किमान पाच ते सहा वेळा सेवन केला जाते. साधारणत: कमी दर्जाची तंबाखू खर्रा १५ रुपये असून एक विशिष्ट तंबाखू खर्रा पाहिजे असल्यास तो ३0 रूपयांचा आहे. तसेच तंबाखूच्या एका पुडीची किंमत ४ ते ५ रुपये आहे. सिगारेटची किंमत ३ रूपयापासून सुरू होत असून हा साधारणत: तीनही वस्तूंचा खर्च १00 रूपयाच्यावर लागतो. साधारणत: सर्वसामान्य व्यक्तीला किमान २ र्खे दिवसभरात लागत असले तरी या खर्याचा खर्च ३0 रूपयाच्यावर जातो. त्यातून त्याला पैसे देऊन एक प्रकारचे तंबाखू मिळते. विकत घेऊन शरीराला बिमारी घेण्याचे महाऔषधच आले आहे. ते शरीरासाठी हानीकारक आहे, असे तंबाखूच्या सिगारेटच्या पॉकिटावरच लिहून असले तरी त्याला सेवन केले जाते. बाहेरगावी राहून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या दोन वेळच्या डब्याचा खर्च ३0 ते ३५ रुपए पडतो. मात्र खर्याचा खर्च ४0 रूपयाच्यावर पडत असल्यामुळे जेवनापेक्षा खर्रा महाग म्हणण्याची वेळ आली आहे. शरीरासाठी हानीकारक असणार्या तंबाखू विक्रीला शासन कर देऊन विक्रीची परवानगी शासन देत आहे.याचाच अर्थ शासन आरोग्यास हानीकारक असणार्या वस्तूंच्या विक्रीवर कोणताही प्रतिबंध लावत नाही. उलट तंबाखू उत्पादित मोठमोठय़ा कंपन्यांना मोठमोठय़ा बँकानी दिलेल्या कर्जावरील व्याजावर सबसिडी देते. मात्र जो शरीराला पोषक आहार असलेले अन्न पुरवितो त्या शेतकर्यांच्या मालाला योग्य तो भाव तसेच नैसर्गिक आपत्ती बाबत तात्काळ मदत तर त्याच्यावर असलेल्या कजार्मुळे व्याजावर कोणताही सबसिडी देण्यास अनुकूलता दाखवित नाही. म्हणजे शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल प्राप्त होत नाही म्हणून सरकार शेतकर्याप्रती उदासीन दिसते. दुसरीकडे आरोग्यास हानीकारक असणार्या उत्पादन विक्री करणारे मालक करोडोचा नफा कमवितात. तरीही त्यांच्या उत्पादन विक्रीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. नवीन तंबाखू उत्पादन बाजारपेठेतयेत असून याबाबत व्यापक जनजागृतीची गरज आहे.
खर्रा, सिगारेटमुळे आरोग्य धोक्यात!
By admin | Updated: May 10, 2014 23:25 IST