या शिबिरात गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ, शिक्षण विभाग विस्तार अधिकारी दीपमाला भटकर, स्काउटचे जिल्हा सहाय्यक आयुक्त पी.जे.राठोड, रमेश चव्हाण, संतोष राठोड, विशेष शिक्षक प्रकाश खाटीक, मुख्याध्यापक मो.आरीफ यांची उपस्थिती होती.
------------------------------------
चोहोटा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन
चोहोटा बाजार: गणतंत्र दिनाच्यानिमित्ताने एकता फाउंडेशनतर्फे करतवाडी स्थित साबरीया मशिदीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबाच्या आरोग्य हितासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात सर्व प्रकारच्या आजारांचे निदान करण्यात येणार आहे.
--------------------------------
५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
—--------------------------------------
कान्हेरी गवळी : येथील रहिवासी एका ५५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २५ जानेवारी रोजी संध्याकाळी उघडकीस आली. बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये येत असलेल्या ग्राम कान्हेरी गवळी येथील महावीर रामअवतार कोकबन्स (५५) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
------------------------------------
बोर्डी येथे सैनिकांचा सन्मान सोहळा
बोर्डी: अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बोर्डी येथील भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. कार्यक्रमात नायब तहसीलदार राजेश गुरव, ठाणेदार ज्ञानोबा फड यांची उपस्थिती असणार आहे.
-------------------------------------
कांदा लागवडीला सुरुवात
पातूर: पातूरसह परिसरात कांदा लागवडीस सुरुवात झाली आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सिंचनाची व्यवस्था आहे. त्यामुळे पातूर परिसरासह तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच यंदा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
----------------------------------
पातूर येथील बाजारात ८७० क्विंटल तुरीची खरेदी
पातूर: बाजारात नवीन तुरीची आवक वाढल्याचे दिसून येत आहे. शनिवारी येथील धान्य बाजारात ८७० क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. सध्या तुरीला ५,५०० ते ५८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
-------------------------------------
आडसुळ-तेल्हारा मार्गाचे काम संथ गतीने
मनात्री: आडसूळ ते तेल्हारा मार्गाचे काम अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. मार्गाने धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर पाणी टाकण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.