शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

केळीच्या कचऱ्यापासून अन्नद्रव्य निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:13 IST

खंडाळा : केळीच्या पिकापासून निर्माण होणारा कचरा, साली अस्ताव्यस्त पडल्यामुळे पर्यावरणाला धोका तसेच आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. यावर उपाय ...

खंडाळा : केळीच्या पिकापासून निर्माण होणारा कचरा, साली अस्ताव्यस्त पडल्यामुळे पर्यावरणाला धोका तसेच आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. यावर उपाय करत कचऱ्याचा उपयोगातून अन्नद्रव्य निर्मिती करण्याचा प्रोजेक्ट खंडाळा शाळेच्या विद्यार्थिनीने भारत सरकार च्या विज्ञान व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला सादर केला. याप्रकल्पाची निवड इन्स्पायर अवॉर्डसाठी करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्तरावर इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक तंत्रज्ञानात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन भारत सरकारद्वारा प्रोत्साहित केल्या जाते. यावर्षी इंस्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनीसाठी तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा, खंडाळा येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी ईश्वरी गजानन गोलाईत हिच्या केळी पिकावर आधारित क्लीन इंडिया, वेस्ट फॉर बेस्ट या प्रोजेक्टची निवड झाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला आहे. केळी कचऱ्यापासून पोटॅशियम निर्मिती करून फूल शेती संवर्धन करण्यासाठी विशेष करून प्रोजेक्टमध्ये दखल घेण्यात आली आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या खंडाळा परिसरात बहुसंख्य शेतकरी केळी या पिकांची लागवड करतात. केळी कटाईनंतर उर्वरित झाड व पाने, केळीची साल यांची विल्हेवाट योग्यरीतीने करून अन्नद्रव्य निर्मितीकरून फूलशेती व पिकांना पोषक घटक तसेच स्वच्छ भारत अभियानला हातभार लावण्यासंदर्भात प्रोजेक्टमध्ये सूचित करण्यात आले आहे. प्रोजेक्टच्या निर्मितीसाठी विशेष मार्गदर्शन परिसर व विज्ञान उपक्रम प्रमुख अध्यापिका सुरेखा हागे, गोपाल मोहे, निखील गिऱ्हे व वर्गशिक्षक तुलसीदास खिरोडकार यांनी केले आहे. कोरोनाच्या संकटातही विद्यार्थ्यांना सातत्याने अध्ययनरत ठेवण्यासाठी रेडिओ खंडाळा, मोहल्ला शाळा, बोलक्या भिंती, स्वाध्यायमाला, कृतिपत्रिका, परिसर व विज्ञान असे विविध उपक्रम शाळेच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. इन्स्पायर अवॉर्डसाठी प्रोजेक्टची निवड झाल्याने ईश्वरीचे केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शैला खंडेराव उपाध्यक्ष प्रशांत आंबुसकर, शिक्षणतज्ज्ञ दिनकर धुळ, मुख्याध्यापक शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, राजेंद्र दिवनाले यांनी कौतुक केले आहे.

-------------------------

विद्यार्थ्यात वैज्ञानिक जाणीव जागृती व नवनिर्मितीसाठी विविध उपक्रम परिसर व नैसर्गिक घटकांचा उपयोग करून राबविले जातात.

-सुरेखा ब्रह्मदेव हागे, उपक्रम प्रमुख परिसर व विज्ञान